Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

महिलेला जिवंत जाळले
बुलढाणा, १९ मे / प्रतिनिधी

 

शहरालगत असलेल्या सागवन परिसरात शुल्लक कारणाच्या भांडणावरून शेजारी असलेल्या एका महिलेने दुसऱ्या महिलेस जिवंत जाळल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील जळालेल्या महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिने दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीवरून आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागवन परिसरातील लीला संजय भाकरे (२६) या महिलेस शेजारी राहणाऱ्या आरोपी सुषमा कचरु पाडळे या महिलेने जिवंत जाळल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील काही नागरिकांनी जळालेल्या लीला संजय भाकरे यांना उपचारार्थ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
यावेळी पोलिसांनी पंचनामा केला. तसेच विशेष दंडाधिकारी यांना जळालेल्या महिलेची मृत्यूपूर्व जबानी घेतली. त्या लीला संजय भाकरे यांनी सांगितले की, शेजारी असलेल्या सुषमा कचरु पाडळे या महिलेशी भांडण झाले. या भांडणामुळे रागाच्या भरात मी अंगावर रॉकेल घेतले. दरम्यान, आरोपी सुषमा पाडळे या महिलेने माझ्या अंगाला माचिसची काडी लावली त्यामुळे मी जळाली.
यावरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.