Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

तायक्वांडो प्रशिक्षण शिबिराचा समारोप
गोंदिया, १९ मे/ वार्ताहर

 

जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व गोंदिया तालुका तायक्वांडो अकादमीच्यावतीने जुना पोलीस मुख्यालय, मनोहर चौक, येथे तीन दिवसीय तायक्वांडो प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गोंदिया तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
तालुका तायक्वांडो असोसिएशनचे मुख्य सचिव राजू चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिरात तायक्वांडो बेसिक, तायक्वांडो फाईट आदीचे प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. शाह अग्रवाल यांनी तीन दिवस चाललेल्या शिबिरातील विद्यार्थ्यांची फळ व फराळांची व्यवस्था केली होती. शिबिराच्या समारोप प्रसंगी मुख्य प्रशिक्षक दुलीचंद मेश्राम, डॉ. नवीन शाह यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून तायक्वांडो खेळाची माहिती दिली. डॉ. नवीन शाह म्हणाले की, उन्हाळ्यातही मुलांनी या शिबिराचा लाभ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
शिबिरात आलेल्या विद्यार्थ्यांना दीपक शिक्का, मालती शेंडे, नितेश मेश्राम, मुकेश पाचे, नीलेश फुलबांधे, सुषमा टेकाम या प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल चौरागडे, रमेश बावनकर, विशाल भोवते, नशीब सौरठीया या प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.