Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

सुसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचा समारोप
शेंदुरजनाघाट, १९ मे / वार्ताहर

 

येथील गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने सुसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाचा विकास मूल्यसंवर्धन, भाषण, संभाषण, कला, गायन, ज्युडोकराटे, राष्ट्रीय गीते, योगा, प्राणायाम, व्यसनमुक्त जीवन राष्ट्रधर्म, सर्वधर्म समभाव कथ्थकनृत्य आदी विषयांची माहिती देण्यात आली.
प्रशिक्षक म्हणून वरुड येथील पतंजली योग समितीचे गिरीधरराव देशमुख, संयोजिका सोहितकर यांनी योगाप्राणायाम शिकविले. युवराज दुपारे यांनी ज्युडो कराटे शिकविले.
थोरांची चरित्रे, संत चरित्रे, वक्तृत्व कला, सुंदर हस्ताक्षर ग्रामगीता तत्त्वज्ञान विविध कला गुणांचे संवर्धन व्यसनमुक्ती या सर्व विषयांवर छाया पाचघरे यावली (शहीद), भाऊराव वऱ्होकर, प्रा. बी.के. ठाकरे, उन्नती अ. चौधरी, सविता म. सावरकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होते. शंभर विद्यार्थ्यांचे शिबीर यशस्वीपणे पार पडले.
या शिबिराचा समारोप माजी नगराध्यक्ष जगदीश काळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गुरुकुंज मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. संचालन सरिता गणोरकर यांनी केले. तसेच आभार उन्नती अ. चौधरी यांनी मानले. शिबिरातील विद्यार्थ्यांनी ज्युडो कराटे, हम सब एक है, पर्यावरण संस्कृती यावर प्रात्यक्षिके सादर केली.
शिबिराला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष वडस्कर, विजय देवळे, भांडारकर, फुंडकर आदींनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. शिबिरासाठी गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शिबिराकरिता जनता शिक्षण संस्थेचा सांस्कृतिक हॉल संस्थाध्यक्ष व सचिवांनी उपलब्ध करून दिला.