Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

रिसोड तालुक्यात पाणी टंचाई
रिसोड, १९ मे / वार्ताहर

 

रिसोड तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. रिसोड शहरात एक दिवसाआड पाणी मिळते. शहरातील काही भागात मोटारपंप लावून मोठय़ा प्रमाणात पाणी घेतले जात असल्याने सारखा पाणीपुरवठा होत नाही.
नळधारक नळांना मोटारपंप लावून पाणी घेताना आढळल्यास नळधारकावर कारवाई करण्याचा आदेश मुख्याधिकारी सुधाकर पानझले यांनी दिला. शहराला अडोळ धरणातून पाणी पुरविले जाते. तांत्रिक बिघाड वगळता शहराला नियमित मुबलक पाणी मिळते. नगराध्यक्षासह नगरसेवक व मुख्याधिकारी याकडे लक्ष पुरवितात.
प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
शासनाने प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घातली असताना सुद्धा व्यावसयिकांकडून पिशव्यांचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य घेण्यात येत असून शासनाच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होत आहे. नागरिकांकडून उपयोग झाल्यानंतर फेकून देण्यात आलेल्या प्लॅस्टिक पिशव्यामुळे शहरात सर्वत्र दरुगधी, कचरा नाल्यामध्ये अडकलेल्या दिसत आहे तरी नगर परिषद प्रशासनाने विशेष मोहीम राबवून प्लॅस्टिक पिशव्या वापरा वर आळा घालावा, अशी मागणी होत आहे.