Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

मुंबई, गुजरातकडची पाठवणी थंडावल्याने नाशिकच्या बाजारावर पालेभाज्यांचे राज्य
घाऊक बाजारात दर घटूनही ग्राहकांना लाभ नाही

प्रतिनिधी / नाशिक

वाढत्या उष्णातामानाच्या परिणामी वाहतुकी दरम्यानच पालेभाज्या मोठय़ा प्रमाणावर खराब होत असल्याने येथून मुंबई, ठाणे व गुजरातच्या बाजारपेठेत होणारी या कृषीमालाची पाठवणी तूर्तास थंडावली आहे. मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांनी स्थानिक बाजारात हा माल विक्री करण्यास प्राधान्य दिल्याच्या परिणामी ऐन उन्हाळ्यात नाशिककरांना मुबलक प्रमाणात हिरव्यागार पालेभाज्या उपलब्ध झाल्याचे दृष्य दिसत आहे.

वेचक!
‘सी.व्ही.’ किंवा ‘बायोडाटा’ हे आजच्या करिअरिस्ट तरुणांचे परवलीचे शब्द. त्यामुळे आपला बायोडाटा अधिकाधिक भारदस्त कसा होईल, अशी या मंडळींची सतत खटपट असते. काही जण तर त्यासाठी शेकडो, हजारो रुपये मोजायला तयार असल्याने त्यावर पैसे कमावणाऱ्या कमर्शिअल फर्मस् देखील अलीकडे उदयाला येत आहेत. पण, दुसरीकडे आयुष्याची अनेक वर्षे खर्ची घालून नाशिकच्या गंगाधर गारखेडकरांनी निरपेक्ष भावनेने बनविलेले शेकडो संतांचे ‘बायोडाटा’ पाहिले की नतमस्तक झाल्याशिवाय रहावत नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी असली तरी केवळ मराठीच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षांतील संतांचा परिचय भावी पिढीला व्हावा, म्हणून त्यांनी विविध संप्रदायांच्या शेकडो संतांची माहिती संकलीत केली असून ‘भारतीय संत दर्शन’ नावाने त्याची ठिकठिकाणी प्रदर्शनेही भरविली आहेत.

नव्या खासदारांकडून अधिक अपेक्षा
प्रतिनिधी / नाशिक

रेल्वे संबंधित अनेक प्रश्नांचे घोंगडे भिजत पडलेले बघण्याची सवय नाशिककरांना असली तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी रेल्वेशी निगडीत विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याने आता त्या दृष्टीने किती लवकर पावले उचलली जातात, ते पाहावे लागेल. बदलत्या परिस्थितीत रेल्वे विषयक समस्या सुटण्याची निकड कधी नव्हे एवढी जाणवत असल्याने नव्याने निवडून आलेले खासदार रेल्वे प्रशासनाकडून त्यांचा निपटारा करण्यावर भर देतात, की केवळ आश्वासनावरच झुलवत ठेवण्याचा खेळ मागल्या पानावरून पुढे सुरू ठेवला जातो, त्याविषयी प्रवासी वर्गात उत्सुकता दिसून येत आहे.

नियमित स्वच्छतेच्या मागणीसाठी
पालिका मुख्यालयासमोर ‘कचरा फेको’ आंदोलन

प्रतिनिधी / नाशिक

वारंवार मागणी करूनही घंडागाडी सुरू केली जात नाही तसेच परिसराची स्वच्छता व गटारींची साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक ९३ मधील शेकडो नागरिकांनी बुधवारी दुपारी महापालिकेच्या मुख्यालयावर धडक मारत प्रवेशद्वारासमोर कचरा फेकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. अचानक झालेल्या कचरा फेको आंदोलनामुळे पालिकेच्या वर्तुळात एकच धावपळ उडाली.

लोकशाहीचा जय हो !
निवडणूक कर्मचाऱ्यांची भूमिका कोणतीही निवडणूक यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण ठरत असते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनिमित्त कर्मचाऱ्यांना आलेले अनुभव प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी दाखवून देतात. कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींचा सामना करावा लागतो. या सर्व प्रक्रियेतून जाणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा हा अनुभव.

तंटामुक्त अभियान प्रभावशील होण्याची गरज
ग्रामीण भागाच्या विकासास आड येणारा घटक म्हणजे किरकोळ कारणांवरून होणारे तंटे. या तंटय़ांवर उपाययोजना केल्यास गावांचा विकास अधिक वेगाने व प्रभावीपणे होऊ शकतो. पोलिसांवरील ताणही कमी होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू करण्यात आले.

श्री मंगल गुणगौरव पुरस्कार जाहीर
नाशिक / प्रतिनिधी
श्रीग्रृप फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वाने यश मिळवलेल्या गुणवंतांना ‘श्रीमंगल गुणगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येते. हा सोहळा २४ मे रोजी सायंकाळी ५.३०ला कालिदास कलामंदिर येथे होणार आहे.
अपर पोलीस अधीक्षक रमेश चौधरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर नगरसेवक विक्रांत चांदवडकर, विनोदी कथाकथनकार जगदीश देवपूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पुरस्कार सोहळ्यात आय.ए.एस. उत्तीर्ण झालेले संजय आखाडे, पोलीस उपअधीक्षकपदी निवड झालेली कविता नेरकर, २१ व्या वर्षी सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झालेली स्नेहल बिराडे, ‘मी मराठी’वरील वृत्तनिवेदक योगेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेली कल्पना बत्तासे, वाणिज्य शाखेत बारावीमध्ये बोर्डात पहिला आलेला सौरभ चौधरी, पोलीस निरीक्षक म्हणून निवड झालेल्या मोहिनी लोखंडे आणि मुंबई हल्ल्यातील शहीद अरूण चित्ते यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास नाशिककरांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक चौधरी, उपाध्यक्ष गोरख चौधरी, सरचिटणीस जी. एम. जाधव यांनी केले आहे.

आशा रणधीर यांचे निधन
नाशिक / प्रतिनिधी

येथील नेहरू चौकातील व्यावसायिक मनोज रणधीर यांच्या मातोश्री आशा प्रभाकर रणधीर (ताई) यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे. रणधीर यांच्या अंत्ययात्रेत विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दह अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.