Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

स्वपक्षातील अडथळ्यांवर मात करण्यात राष्ट्रवादीला अपयश
निवडणूक विश्लेषण (दिंडोरी मतदारसंघ)
वणी / वार्ताहर

बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्णन केलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी बाजी मारली. पाच आमदार, उपमुख्यमंत्री, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांपासून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना देखील नरहरी झिरवाळ यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवल्याने पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.

सप्तशृंग गडावर मद्यपींचा धिंगाणा
वणी / वार्ताहर

‍ तीर्थस्थळाचे पावित्र्य नष्ट होण्याची भीती
‍ गडावर आठ-दहा वर्षांपासून बेकायदा दारू विक्री
‍ तक्रार करुनही प्रशासन यंत्रणेकडून कारवाई नाही
‍ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे -महिला बचत गट
सप्तशृंग गडावर विविध मार्गाने होत असलेली मद्याची वाहतूक व मद्यपींच्या धिंगाण्यामुळे तीर्थस्थळाचे पावित्र्य नष्ट होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष देण्याची मागणी महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला गळती
पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्याची सेनेची मागणी
वार्ताहर / धुळे
ऐन टंचाईच्या काळात शहराला पाणी पुरविणाऱ्या तापी पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी केवळ एक ते दिड किलोमीटरच्या अंतरात तब्बल २२ ठिकाणी फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. टंचाईच्या परिस्थितीचा सामना कसा करावा, याविषयी नागरिकांना उपदेशाचा डोस पाजणाऱ्या व शहरवासियांना दररोज पाणी पुरवठा करण्याची घोषणा करणाऱ्या महापालिकेने आधी पाणी पुरवठय़ाचे सूत्रबध्द नियोजन करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व महापालिकेतील विरोधी पक्षनेते अतुल सोनवणे यांनी केली आहे.

वाहनावर अंबर दिवा; महापालिका आयुक्तांना दंड
वार्ताहर /जळगाव

शासनाची परवानगी व पात्रता नसताना महापालिका आयुक्तांनी आपल्या वाहनावर अंबर दिवा लावल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांना शंभर रुपये दंड केला आहे. दिवा काढल्याने व्यथित झालेल्या आयुक्तांनी दुसऱ्या कारणाने वाहनावर अंबर दिवा लावण्याची परवानगी मागितली असून तीसुद्धा नियमबाह्य़ असल्याने रद्द करावी आणि आयुक्तांची बदली करावी, अशी मागणी अ‍ॅड. विजय पाटील यांनी केली आहे.

नागन प्रकल्पाचे काम पुन्हा लांबणीवर!

रेल्वे इंजिनीअरिंग कारखान्यात कामगारांचा विरोध सप्ताह

कापूस उत्पादकांच्या असंतोषास निर्णयातील त्रुटी कारणीभूत