Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

विशेष

मर्सिडिस बेंझचा मोह
दक्षिण आफ्रिकेतील सरकारमध्ये नव्यानेच वाहतूक मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सबू नदेबेले या गृहस्थांना भेटीदाखल मिळालेल्या मर्सिडिस बेंझ मोटारीचा मोह अद्याप सोडावासा वाटत नाही. सदर मंत्र्याला मंत्री होण्यापूर्वी काही कंत्राटदारांनी मर्सिडिस गाडी भेटीदाखल दिली होती. मंत्र्यांना मिळालेली गाडी त्यांनी परत करावी, अशी मागणी विरोधी गटांनी तसेच सत्तारूढ आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या मित्र पक्षांनी केली आहे पण मंत्र्यांना त्यात काहीच गैर वाटत नाही. मला जी गाडी मिळाली आहे ती, मंत्री होण्यापूर्वी कितीतरी आधीपासून मला देण्याचे ठरले होते.

‘नवाक्षर दर्शन’चा विशेषांक
अनियतकालिके ही कोणत्याही भाषिक संस्कृतीची आभूषणे असतात. व्यवसाय म्हणून निघणारी, मोठे आर्थिक पाठबळ असणारी जी नियतकालिके असतात ती प्रामुख्याने रंजनवादी असतात आणि एका मोठय़ा जनसमुदायाची गरज असतात. हा मोठा वाचकवर्ग ताब्यात ठेवायचा तर त्यांच्या आवडीनिवडी सांभाळणे या नियतकालिकांना भाग पडते. त्यामुळेच मोठा खप असूनही अनेकदा अशी नियतकालिके सांस्कृतिक नेतृत्व येऊ शकत नाहीत. या उलट लघू नियतकालिके आणि अनियतकालिके व्यावसायिक बंधनांपासून मुक्त असल्याने गंभीरपणे वैचारिक मंथन घडवून आणू शकतात. सुदैवाने, मराठी भाषेला अशा नियतकालिकांची मोठी परंपरा आहे. आर्थिक पाठबळाअभावी आणि अनेकदा एकांडय़ात शिलेदारांवर भार असल्याने, अशी नियतकालिके मान टाकतात.

कचऱ्याने केली ‘कोंडी’!
‘नाक दाबले की तोंड उघडते’ ही म्हण सध्या पुणे शहर व त्याची व्यवस्था पाहणाऱ्या महापालिका प्रशासनालाही लागू पडेल. पुण्यातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याकडे केवळ दुर्लक्ष झाले. त्याचा त्रास सहन करणाऱ्या, कचरा डेपोच्या परिसरातील उरुळी, फुरसुंगी येथील रहिवाशांनी डेपोत जाणाऱ्या कचऱ्याच्या गाडय़ा अडवून प्रशासनाची कोंडी केली. परिणामी पुणे शहरातच कचरा साचून राहिला. अशाप्रकारे नाक दाबले गेल्याने महापालिकेतर्फे सात महिन्यांच्या आत या समस्येबाबत ठोस उपाय करण्याचे ठरविण्यात आले. म्हणजेच गेल्या आठ-दहा वर्षांत जे केले गेले नाही ते आता सात महिन्यांमध्ये करून दाखविण्याचे आव्हान पालिकेने स्वीकारले आहे. त्यावर भरवसा ठेवून कचरा डेपोजवळील ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले, पण हे आव्हान पालिका पेलणार का आणि कसे, याबाबत उत्सुकता आहे.