Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

घरोघरी - मनाचा कौल
शाश्वती : या रश्मीबाई, कशा आहात? मग कधी जाणार अमेरिकेला?
रश्मी : शाश्वती, मी नाही जाणारे अमेरिकेला.
शाश्वती : मग? मैत्रेय एकटाच जाणारे?
रश्मी : हो.
शाश्वती : म्हणजे दोघंही जण एक वर्ष तरी बॅचलर लाईफ एन्जॉय करणार तर. गुड!
रश्मी : तुला आश्चर्य नाही वाटलं माझा हा निर्णय ऐकून?
शाश्वती : आश्चर्य? वाटलं ना!
रश्मी : मग तू काहीच बोलली नाहीस माझ्या निर्णयावर!
शाश्वती : मी काय बोलायला हवं तुझ्या निर्णयावर?
रश्मी : शाश्वती, अग, माझा अमेरिकेला न जाण्याचा निर्णय ऐकला की, सगळ्यांकडून एकच रिअ‍ॅक्शन मिळतेय. की, मी कसा चुकीचा निर्णय घेतलाय.
शाश्वती : That is quite expected कारण तू काही तरी वेगळा, प्रवाहाविरुद्धचा निर्णय घेतला आहेस ना! अग, सर्वसामान्य माणसाची अपेक्षा काय असते? मैत्रेय म्हणतो तसं- जेथे राघव तेथे सीता. नवऱ्यानं आणि बायकोनं वेगवेगळं

 

राहणं, तेही तुमचं लग्न इतकं ताजं ताजं असताना हे समाजमनाला पटणंच शक्य नाही.
रश्मी : तुला नाही का ग शाश्वती, लोकं भंडावून सोडत? तूही तर एकटीच राहतेस.
शाश्वती : खरं सांगू का रश्मी, माझ्या बाबतीत हा प्रश्नच आला नाही.
रश्मी : म्हणजे?
शाश्वती : अग, शार्दूलनं इथलं सगळं वाईंड अप करून सोनगावसारख्या छोटय़ा गावात जाऊन राहायचा निर्णय घेतला ना, तेव्हा मी त्याच्याबरोबर जाईन, अशी कोणी अपेक्षाच केली नाही.
रश्मी : पण शार्दूलनंसुद्धा कसा काय असा निर्णय घेतला ग?
शाश्वती : एकंदरीतच शहरातलं वातावरण, नोकरीतलं राजकारण, तो खूप कंटाळला होता. खूप दिवसापासून हे त्याच्या डोक्यात येत होतं. त्याला जो कंटाळा आला होता ना, त्याचं रिफ्लेक्शन त्याच्या कामावर, त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पडलं होतं. त्याला एका ब्रेकची खूप गरज आहे हे स्पष्टपणे जाणवत होतं. त्यामुळे निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी करायला त्याचं मन धजावत नव्हतं.
रश्मी : मला असं वाटतं, प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते नाही का?
शाश्वती : हो नं एक दिवस तो परत आला तोच मुळी राजीनामा देऊन.
रश्मी : तुला भीती नाही वाटली, त्यानं राजीनामा दिल्याची?
शाश्वती : भीती काय वाटायची? कारण राजीनामा देण्याचा निर्णय केव्हाच झाला होता. त्या दिवशी तो फक्त त्यानं अंमलात आणला.
रश्मी : त्यावर तुमच्या आधीच खूप चर्चा झाल्या असतील ना!
शाश्वती : चर्चा? नाही फारशा नाहीत. कारण तसेही आम्ही एकमेकांचे निर्णय एकमेकांवर लादणाऱ्यातले नाही आहोत. त्यामुळं त्यानं त्याच्या आयुष्याची दिशा कशी बदलणार आहे हे मला सांगितलं आणि मी पुढं काय करायचं, हे माझ्यावर सोडलं.
रश्मी : मग तुला नाही जावंसं वाटलं त्याच्याबरोबर?
शाश्वती : थोडे दिवस मीही कन्फ्यूज झाले होते. म्हणजे त्याच्याबरोबर जावसंही वाटत होतं, पण शार्दूल नव्यानं तिथं काहीतरी करु बघत होता, अशा वेळेलामी बाकीच्या सर्व जबाबदाऱ्या- विशेषत: आर्थिक- घेणं आवश्यकच होतं. शिवाय माझ्या कामाला तिथं काही स्कोपच नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याला त्याच्या कामाचा कंटाळा आला होता. तसं माझं नाहीये. मी माझं काम खूप एन्जॉय करते.
रश्मी : असा कामाचा कसा कंटाळा येऊ शकतो?
शाश्वती : सॉरी, मीच चुकीची टर्म वापरली. त्याला त्याच्या कामाचा नाही तर कामाला चिकटलेल्या राजकारणाचा कंटाळा आला होता.
रश्मी : पण राजकारण तर काय कुठेही असतंच. It is part and parcel of any job.
शाश्वती : म्हणून तर तो सगळं वाईंड अप करूनच गेला. दुसऱ्या नोकरीच्या बिकरीच्या मागं लागलाच नाही.
रश्मी : पण मग आता तरी खूश आहे?
शाश्वती : खूश? विचारूच नकोस. अग, तो मुळातच खूप लाईव्हली आहे. मधल्या काळात मिटूनच गेल्यासारखा झाला होता. पण आता मला असं वाटतं, मला तोच पूर्वीचा शार्दूल परत मिळालाय.
रश्मी : पण तू त्याला ‘मिस’ करत नाहीस?
शाश्वती : अगं आज आम्ही दोघंही आपापल्या कामात इतके गढून गेलोय की विचारुच नको. शिवाय संपर्क साधनं किती हातात असतात आपल्या. त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करुन घेतो. अगं परवा तर शार्दूलने मजाच केली. किती वाजता फोन केलाय माहितीय मला.. रात्री दीड वाजता. कारण एक भन्नाट कल्पना त्याच्या डोक्यात आली होती. आणि ती त्याच वेळेस त्याला माझ्याबरोबर शेअर करायची होती. खरं सांगू का रश्मी, शार्दूल आणि मी बरोबर राहत होतो खरे. पण मनानं खूप दूर गेलो होतो. कारण शार्दूल घुमा, खूप चिडचिडा झाला होता. आता दूर राहतोय, पण मनानं परत खूप जवळ आलोय.
रश्मी : पण मग फॅमिली लाईफचं काय?
शाश्वती : फॅमिलीतल्या सगळ्यांनी एकत्र राहणं महत्त्वाचं असतंच ग. त्यासाठीच तर आपण लग्न करतो. फॅमिली वाढवतो. पण फॅमिलीतही प्रत्येकाला स्वत:ची स्पेसही असणं आवश्यक असतं. त्यावेळेला ती स्पेस शार्दूलला मी दिली नसती तर कदाचित गोष्टी अजून गंभीर वळणावर गेल्या असत्या. त्यावेळेला ‘तू दूर दूर तेथे’ या परिस्थितीत मला काय काय गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे या पेक्षा शार्दूलला मोकळा श्वास घेऊ देणं महत्त्वाचं होतं. मी तेच केलं. मी फक्त माझ्या मनाचा कौल घेतला आणि तूही आता तेच केलयस.
रश्मी : शाश्वती, अग, तुझ्याशी बोलून इतकं बरं वाटतंय ना. शाल्मली म्हणालीच होती की, या बाबतीत तू शाश्वतीशी बोल म्हणून. मला आता अगदी पटतंय तिचं म्हणणं.
शाश्वती : आपल्या विचारांशी साधम्र्य असणारे विचार ऐकायला मिळाले की, आपल्या विचारांना बळकटी येतेच.
रश्मी : अगदी खरंय. सगळ्यांनी मला वेडय़ात काढल्यामुळे माझी अवस्था खूप दोलायमान झाली होती. पण आता मला खूप छान, मोकळं, मोकळं वाटतंय.
shubhadey@gmail.com