Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे की नाही, हा विषय जवळ जवळ प्रत्येक ग्रुपमध्ये एकदा तरी चर्चिला जातोच. सकाळी एकदा घराबाहेर पडलं की रात्री कधी घरी येऊ याचा नेम नाही. त्यामुळे वृत्तपत्र वाचन तसं कमीच झालंय. बाकी काही वाचलं नाही तरी ज्योतिष वाचून घराबाहेर पडणारे जसे लोक आहेत तसेच या सगळ्यावर विश्वास नाही किंवा थोडाफार विश्वास आहे अशा मताचेही अनेकजण असतात. हे भविष्य पाहत असताना ते जन्मतारखेवरुन पाहावे की राशीवरुन? या द्विधा मनस्थितीतही अनेकजण असतात. या बाबत तरुणांना काय वाटतं ते पाहू या..

 

अविनाश गुरव
(क्रिकेटर, एस.वाय.जेसी)

भविष्य तसं तर मी कधी तरीच वाचतो. कामाच्या व्यापात काही फावला वेळ घालवावासा वाटला तरच मनोरंजन म्हणून मी ते वाचतो. विश्वास तसा नाही कारण खाटल्यावर बसून परमेश्वर कधीच पदरात फळ टाकत नाही. प्रयत्न हे करावेच लागतात आणि वाचलंच तर शक्यतो इंग्रजीच वाचतो कारण इंग्रजी वृत्तपत्रांत बिझनेस विषयीही सांगितलेलं असते. जे मराठी वृत्तपत्र शक्यतो टाळताना दिसते.

विशाखा सुरवाडे (रिटेल मॅनेजर)
मी भविष्य कधीच वाचत नाही कारण मला वाटतं ते सारं फेक आहे. वृत्तपत्रातील एखाद्याने लिहिलेलं ते भविष्य किती जणांना लागू पडणार? लिहिणारा त्याच्या तर्काने काही तरी लिहितो आणि आपण ते आपल्या आयुष्यावर लागू पडतं का ते पाहतो हे जवळ जवळ खुळचटपणाचं लक्षण आहे.

शेखर वेडगे (पोलीस)
तसं भविष्य मी कधी तरीच वाचतो. कारण मला असं वाटतं भविष्य तेव्हाच वाचलं जावं जेव्हा आपण संकटात असतो किंवा एखादी गुडन्यूज येणार असेल (निकाल, जॉब वगैरे) तेव्हा त्यात काही अडचणी तर येणार नाहीत ना हे बघण्यासाठी मी हे भविष्य वाचतो. माझा विश्वास त्या भविष्यावर नाही पण न्यूमरॉलॉजीवर आहे. शेवटी कोही झाले तरी नशिबाचा २% भाग हा असतोच. रोजच्या रोज काही भाविष्य वाचन नाही. दररोज जे वाचतात ते शक्यतो हळव्या मनाचे,घाबरणारे असतात.

पल्लवी भावे (बी.कॉम)
मी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधील भविष्य वाचते. त्यावर तसा विश्वास आहे असं म्हणता येणार नाही. टाइमपास म्हणूनच मी ते वाचते. खास करुन इंग्रजी वृत्तपत्रातील भविष्य वाचते. मराठी वृत्तपत्रातील भविष्य तसे थोडेफार अधांतर असते. कधीकधी मात्र आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी हे भविष्य जुळणारे असते. तेव्हा त्यावर विश्वास बसतो.

सुषमा जाधव
(द्वितीय वर्ष कला)

मराठी भविष्य वाचायला मला आवडते. पण मी सहसा इंग्रजी वृत्तपत्रातीलच भविष्य वाचते. एक कारण म्हणजे इंग्रजी सुधारावं म्हणून आणि दुसरं म्हणजे इंग्रजीतले काही शब्द माझ्या डोक्यावरुन जातात. अशावेळी काही वाईट लिहीलं असेल तर वाईट वाटत नाही. हा पर्याय मराठी वृत्तपत्रात नसतो. थोडाफार विश्वास आहे. पण टाइमपास म्हणून मी ते वाचते.