Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

स्मार्ट बाय
डाबर रोझ फेस फ्रेशनर
उन्हाळ्याच्या दिवसांत थकलेल्या, तेलकट झालेल्या त्वचेवर उपाय म्हणून डाबरने गुलाबाचा सुवास असलेला फेस फ्रेशनर बाजारात आणला आहे. कुठेही घेऊन जाता येणारा हा स्प्रे चेहरा आणि मन ताजं ठेवायला नक्कीच उपयुक्त ठरु शकतो. डाबरच्या प्रिमिअम रोझ टच फेस फ्रेशनरच्या १०० मिली बाटलीची किंमत ६५ रुपये आहे.

पिरॅमल हेल्थ केअर
पिरॅमल हेल्थ केअरने ‘अ‍ॅक्टीपॅच’ हे वेदना शामक औषध बाजारात आणलं आहे. कंबरदुखी, मनगट, पाय मुरगळणे, खेळताना झालेली दुखापत यासारख्या दुखण्यांवर उपाय म्हणून हे औषध बाजारात आले आहे. चार वेगवेगळ्या प्रकारच्या दुखण्यासाठी चार प्रकारांत हे औषध उपलब्ध आहे.

सोनीचा एलसीडी टीव्ही
सोनीने BRAVIA ZXI हा जगातला सगळ्यात लहान एलसीडी टीव्ही बाजारात आणला आहे. ९.९ मिली लांबी व १५ किलो वजनाचा हा टीव्ही तरुणांचे नक्कीच आकर्षण ठरेल.

प्युअर मॅजिक स्पा
टेलीब्रॅण्ड्स ऑफ इंडियाने प्युअर मॅजिक स्पा हे उत्पादन बाजारात आणले आहे. आयॉनिक टेक्नॉलॉजीवर आधारित हे फुट बाथ आहे. या स्पा मुळे शरीरातील टॉक्सीन्स काढून टाकले जातात. आरोग्य सुधारणे, वाढलेले वय कमी दिसून येणे, शरीरातील हानीकारक तत्वांना बाहेर फेकणे, शरीरातील ऊर्जा वाढणे यासारखे फायदे होतात. घरातल्या घरात आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी योग्य असे हे उत्पादन आहे.

शॉपर्स स्टॉपचे ‘सिंपली देसी’ कलेक्शन
शॉपर्स स्टॉपने भारतीय कपडय़ांचे ‘सिंपली देसी’ कलेक्शन सादर केले आहे. अंधेरी, वांद्रे, चेम्बुर, जुहू, कांदिवली, मालाड, मुलुंड आणि वाशी या ठिकाणी विविध ब्रॅण्डसच्या कपडय़ांचे कलेक्शन बघायला मिळेल.

बॅगिटच्या फुलांच्या बॅगा
बॅगीटने खास उन्हाळ्याच्या दिवसांत वापरता येतील अशा पर्सेस बाजारात आणल्या आहेत. उठावदार रंग आणि स्टाईल प्रिंट, बो आणि फुलांचं डिझाईन असलेल्या या पर्सेस तरुणींच्या पसंतीला नक्कीच उतरतील. ९०० ते १४०० रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये या बॅगा उपलब्ध आहेत.

बिबाचे समर कलेक्शन
आफ्रिकन डिझाईनचा वापर करुन तयार केलेले भारतीय छटा असलेले कलेक्शन बिबाने सादर केले आहे. पांढरा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगांत हे कलेक्शन उपलब्ध आहे.

मॅट्रीक्सचा कुलिंग मिंट शाम्पू
मॅट्रीक्सने कुलिंग मिंट शाम्पू आणि कंडिशनर बाजारात आणला आहे.