Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

व्यापार-उद्योग
(सविस्तर वृत्त)

‘एअरटेल’ने १० कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला
व्यापार प्रतिनिधी: भारती एअरटेलने १०० दशलक्ष ग्राहकांचा टप्पा पार केला. यामुळे

 

एअरटेल जागतिक स्तरावरती एकाच देशामध्ये सर्वात जास्त मोबाईल सेवा पुरवणारी तिसऱ्या क्रमांकाची, तर एकाच देशामध्ये सर्वात जास्त एकिकृत दूरसंचार सेवा पुरवणारी सहाव्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.
भारती एअरटेल आज आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी म्हणून उदयाला आली आहे. यापूर्वी कंपनीने ७५ दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ऑगस्ट २००८ तर ५० दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ऑक्टोबर २००७ रोजी पार करत दूरसंचार क्षेत्रात झपाटय़ाने वाढणारी कंपनी म्हणून बहुमान मिळवला होता. भारती एअरटेलने पहिल्या २५ दशलक्ष ग्राहकांचा टप्पा जुलै २००६ मध्ये पार केला आहे. भारती एअरटेलने आपल्या नेटवर्कच्या संवर्धनासाठी व ग्राहकाभिमुख सेवांच्या विस्तारासाठी उपाययोजनांची एक मालिकाच प्रस्तुत केली आहे. या अंतर्गत नेटवर्क संवर्धनासाठी एअरटेल या वर्षअखेपर्यंत १००,००० बीटीएस साईट सुरू करणार असून त्याद्वारे देशातील दुर्गम भागापर्यंत नेटवर्कचा विस्तार केला जाणार आहे. या उपायांमुळे नेटवर्कची गुणवत्ता वाढून एअरटेलच्या ग्राहकांना उच्च दर्जाची जागतिक दूरसंचार सेवा मिळणार आहे व त्यांचा कंपनीवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. सध्या कंपनी आपले संपूर्ण फील्ड लॅण्डलाईन नेटवर्क टप्प्याटप्प्याने आय पी/ब्रॉड बँडमध्ये परावर्तित करणार आहे. या परिवर्तनामुळे भारती एअरटेलला वेगवान इंटरनेट, ट्रिपल प्ले, मीडिया रीच व्ही. ए. एस, एम.पी.एल.एस.सारख्या पुढील जनरेशनच्या अत्याधुनिक सेवा आपल्या रिटेल आणि व्यावसायिक ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे.