Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

राज बोलणार आज!
शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेवर
मुंबई, २१ मे/ खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला अनुल्लेखाने मारणाऱ्या शिवसेना नेत्यांनी आता मनसेमुळे मराठी मतांमध्ये फूट पडल्याचे जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनेच्या मुळावर येणाऱ्यांशी आपले कोणतेही संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. या साऱ्या आक्षेपांना उद्या षण्मुखानंद सभागृहात मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे उत्तर देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

गृह खात्यातील मलईदार विभाग आता काँग्रेसच्या राज्यमंत्र्यांकडे
समर खडस
मुंबई, २१ मे

गृह खाते आर. आर. आबांच्या ताब्यात असताना त्यांनी त्यांचे राज्यमंत्री असलेल्या सिद्धराम म्हेत्रे यांना कुठल्याच विभागाचे काम न दिल्याने म्हेत्रे यांच्या कायम कुरबुरी सुरू असायच्या. मात्र आता नवे गृहमंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसचे गृह राज्यमंत्री नसीम खान व नितीन राऊत यांच्याकडे उपहारगृह, मनोरंजन, रिव्हॉल्व्हरचा परवाना, आदी मलईदार विभागांचे अधिकार सुपूर्द केले आहेत.

पवारका मॅजिक नहीं चला- गोपीनाथ मुंडे
मुंबई, २१ मे/प्रतिनिधी

शरद पवार यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्यात सर्वाधिक मते मिळवून मी विजयी झालो. ‘पवारका मॅजिक नही चला’, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केली. मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश आडासकर यांचा पराभव केला.

पवारांनी सुरू केली पराभवाची कारणमीमांसा !
मुंबई, २१ मे / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवात केली असून, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांना नवी दिल्लीत पाचारण करून त्यांच्याकडून आढावा घेतला. तसेच पुढील आठवडय़ात राज्यातील सर्व नेत्यांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

व्यक्तिकेंद्री राजकारणाचा उदय?
दिनकर झिंब्रे
सातारा, २१ मे

सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशजय उदयनराजे भोसले यांच्या रुपाने खंबीर नेतृत्व मिळाले. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण व आबासाहेब ऊर्फ किसनवीर यांच्या हयातीनंतर जिल्ह्य़ात एकमुखी नेतृत्वाचा अस्त झाला. अभयसिंहराजे, रामराजे यांनी जिल्ह्य़ाचे नेतत्व करण्याचा प्रयत्न केला नाही. माजी मंत्री आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे प्रयत्न विफल ठले. एकमुखी नेतृत्वाची उणीव उदयनराजे यांच्या रुपाने भरून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगोला निवडणूक पवारांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही
सांगोला, २१ मे/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील तीन दिग्गज नेते एकत्र येऊनही शरद पवार यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले नाही. भाजपलाही २००४च्या निवडणुकीच्या तुलनेने, तर महादेव जानकर यांनाही मते कमी मिळाली. पुरोगामी विचारसरणीच्या तालुक्यात जातीयवादाला थारा दिला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तरी दिग्गज नेत्यांत ‘कम खुशी जादा गम’ अशी परिस्थिती दिसून येत आहे.

खासदार आनंद परांजपे यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती!
ठाणे, २१ मे/प्रतिनिधी

मनसेच्या झंझावातात कल्याण लोकसभेची जागा जिंकणारे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांना पक्षश्रेष्ठींनी बढती दिली असून, शिवसेना सचिवपदी परांजपे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

मनमोहन सिंग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार
नवी दिल्ली, २१ मे/खास प्रतिनिधी

काँग्रेस-युपीए सरकारचे नेतृत्व करताना पंतप्रधानपदाची उद्या सायंकाळी राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग सज्ज होत असतानाच आज रात्री उशिरापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील जागा आणि खात्यांच्या मागण्यांवर तोडगा निघत नसल्याचे बघून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या द्रविड मुन्न्ोत्र कलघमने ऐनवेळी नाराज होण्याचा पवित्रा पत्करला. काँग्रेसशी सुरु असलेली चर्चा आणि वाटाघाटी अपयशी ठरल्यामुळे द्रमुकने मनमोहन सिंग सरकारला बाहेरून समर्थन देण्याचे अस्त्र उपसले.

पवारांना फक्त कृषी, पटेल यांना नागरी उड्डयण मंत्रालय मिळण्याची शक्यता नाही, ममतांनी ‘नमते’ घेणे काँग्रेसच्या पथ्यावर
नवी दिल्ली, २१ मे/खास प्रतिनिधी

लोकसभेच्या १९ जागाजिंकणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी ‘नमते’ घेत केंद्रीय मंत्रिमंडळातील जागा आणि खातेवाटपासाठी केलेल्या तडजोडीच्या सूत्राचा वापर करून काँग्रेसने द्रमुक राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या अटी मान्य करण्यासाठी भाग पाडल्याचे आज स्पष्ट झाले.

ओरिसात नवीन पटनायक मंत्रिमंडळाचा शपथविधी
भुवनेश्वर, २१ मे / पी.टी.आय.

ओरिसाचे मुख्यमंत्री म्हणून बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांचा आज शपथविधी झाला. ओरिसात पहिल्यांदाच प्रादेशिक पक्ष स्वबळावर विधानसभेत बहुमत मिळवून सत्तेवर आला आहे. ओरिसाचे सलग तिसरे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम ६२ वर्षीय नवीन पटनायक यांच्या नावावर आज नोंदला गेला. नवीन पटनायक आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील २० मंत्र्यांना राज्यपाल एम.सी. भंडारे यांनी राजभवनातील शानदार समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवीन पटनायक मंत्रिमंडळात ११ मंत्री कॅबिनेट दर्जाचे असून अन्य ९ राज्यमंत्री आहेत. प्रमिला मलिक आणि अंजली बेहरा या दोन महिलांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. पूर्वीच्या बिजद-भाजप सरकारमध्ये मंत्री असलेल्या १२ जणांना यावेळीही संधी देण्यात आली आहे.

तूर्त केंद्रात मंत्रीपद स्वीकारणार नाही - सुळे
बारामती, २१ मे/वार्ताहर

बारामती लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी मी पुणे जिल्ह्य़ाचा दौरा करीत आहे, मतदारसंघातील अनेक प्रश्न समजावून घेऊन ते मार्गी लावावयाचे आहेत. त्यामुळे तूर्त आता तरी मला मंत्रिपद नको आहे जरी मला पक्षाकडून मंत्रिपद मिळाले तरी ते मी आता स्वीकारणार नाही, असे स्पष्ट मत बारामती लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच सुप्रिया सुळे या बारामतीत आल्या होत्या. दोन्ही विभागातील विविध ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे आहेत, मात्र यामध्ये पाणी आणि विजेचा प्रश्न महत्त्वाचा आहे, पाणी टंचाई परिसरामध्ये तातडीने पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र विजेच्या प्रश्नासाठी किमान दोन वर्षे थांबावे लागेल. वीज उपलब्ध करण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत विजेचा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

युतीच्या विरोधात मतदान केलेल्यांत फसगत झाल्याची भावना - अडवाणी
मुंबई, २१ मे/प्रतिनिधी

मुंबईतील ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या विरोधात मतदान केले त्यांना आपली फसगत झाल्याचे जाणवू लागले आहे. याचे प्रत्यंतर येत्या विधानसभा निवडणुकीत येईल, असा दृढ विश्वास लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केला.शिवसेना खासदार भारतकुमार राऊत यांनी अडवाणी यांची भेट घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये अडवाणी यांनी शिवसेनेने महाराष्ट्रात आपला गड राखला याबद्दल समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रात युतीचा प्रचार करण्याकरिता अडवाणी यांनी जे परिश्रम घेतले त्याबद्दल राऊत यांनी शिवसेनेच्यावतीने त्यांचे आभार मानले व शिवसेना-भाजप युती अभंग राहील, अशी ग्वाही दिली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर हेही यावेळी उपस्थित होते.