Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

संदिग्ध कायद्यामुळे नगरसेवक अपात्र न होण्यास पात्र
संजय बापट

सरकारी निधीचा गैरफायदा घेऊ पाहणाऱ्या, अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या आणि सरकारी कामात अडथळा आणू पाहणाऱ्या मुजोर नगरसेवकांवर अंकुश ठेवण्यासाठी अशा नगरसेवकांना अपात्र ठरविणारे कायद्याचे शस्त्र शासनाने पालिका आयुक्तांच्या हातात दिलेले आहे, परंतु या संदिग्ध कायद्याचा फायदा उठवीत अनेक नगरसेवकांनी न्यायालयात विजय मिळविला असून, अशा जवळपास सर्वच निर्णयांत आयुक्तांचे अधिकार निष्प्रभ ठरले आहेत. परिणामी, मुजोर नगरसेवकांवर अंकुश ठेवणारा हा कायदा म्हणजे बिनधारेची तलवार बनली असून, या कायद्याच्या र्सवकषपणाबद्दल नव्याने मांडणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

हाजीमलंगवरील फ्युनिकुलर ट्रॉलीचे भवितव्य जुलैत ठरणार
दिलीप शिंदे

सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हाजीमलंग गडावर भारतात पहिल्यांदा फ्युनिकुलर ट्रॉली कार्यान्वित करण्याचा राज्य शासनाने विडा उचलला असून, त्यास केंद्रीय पर्यावरण विभागाकडून मिळणाऱ्या ना हरकत परवान्याची प्रतीक्षा आहे. यासंदर्भात जुलै महिन्यात अपेक्षित असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीत फ्युनिकुलर ट्रॉलीचे भवितव्य ठरणार आहे. कल्याण रेल्वे स्थानकापासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या हाजीमलंग गडावर सातव्या शतकात संतांचे वास्तव्य होते.

गावकऱ्यांचा वाद मुंबई पालिकेशी; फटका मात्र ठाण्याला
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे शहराची भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या ११० दशलक्ष लिटर्स अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेला भिवंडी तालुक्यातील काही ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे काम ठप्प झाले असून, पालिका आयुक्त ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

‘मानस’ने फुलवली स्किझोफ्रेनिया रुग्णांमध्ये ‘पालवी’
भगवान मंडलिक

स्किझोफ्रेनिया रुग्ण साधारणत: झोपूनच, कधी बसून, तर कधी एक टक लावून बघत बसणार. या रुग्णांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता खूप कमी असते. अशा परिस्थितीत स्किझोफ्रेनिया झालेले रुग्ण उद्योजकाच्या भूमिकेत गेले आहेत, असे कोणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. डोंबिवलीच्या ‘मानस हेल्थ सायकॉलॉजिकल’ संस्थेत स्किझोफ्रेनिया झालेले रुग्ण कागदी पिशव्या, फुलदाणी, कागदांचे पुष्प, मेणबत्त्या, पणत्या, आकाशकंदील तयार करतात.

ब्रह्मांड कट्टय़ावर रंगली हास्यदिंडी
ठाणे/प्रतिनिधी
अत्रे कट्टय़ाच्या धर्तीवर ब्रह्मांड-आझादनगर येथे ‘ब्रह्मांड कट्टा’ सुरू करण्यात आला आहे. या कट्टय़ावर रविवारी ‘हास्यदिंडी’ हा एकपात्री विनोदी कार्यक्रम सादर करण्यात आला. हा कार्यक्रम दूरदर्शनच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सुंदर माझे घर’ या कार्यक्रमाच्या संचालिका व प्रसिद्ध लेखिका मोहिनी निमकर यांनी सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात सुसंवादिका आसावरी पालवणकर यांच्या सुरेल निवेदनाने होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित कवितेचे वाचन समेळ यांनी केले.

कामे अर्धवट टाकून ठेकेदारांनी दाखविला कडोंमपाला दहा कोटींचा ठेंगा
कल्याण/प्रतिनिधी

निर्मल अभियानांतर्गत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे चार हजार आसनांची शौचालये ‘एमएमआरडीए’तर्फे उभारण्यात येणार आहेत. या कामांचे ठेके घेतलेल्या खासगी संस्था आणि त्यांचे उपठेकेदार कामांचे सुमारे दहा कोटी रुपये घेऊन काम परवडत नसल्याने पळून गेल्याने, शौचालयांची शहराच्या विविध भागात सुरू असलेली कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांची शौचालये नसल्याने विशेषत: महिला वर्गाची सर्वाधिक कुचंबणा होत आहे.

बाहेरील शिक्षक वर्ग करताना अधिकाऱ्यांनी केला भ्रष्टाचार महासभेत आरोप
कल्याण/प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शाळांमध्ये अन्य जिल्ह्य़ांमधील सात शिक्षक वर्ग करताना अधिकाऱ्यांनी प्रत्येक शिक्षकामागे सुमारे दोन लाख रुपये घेतले असल्याचा आरोप महासभेत केल्याने खळबळ उडाली आहे. बाहेरून वर्ग केलेल्या शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवा, त्यांचे पगार स्थगित करा, असे आदेश महापौर रमेश जाधव यांनी दुसऱ्यांदा प्रशासनाला दिले.