Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २ ० ० ९

रंगकाम व्यवसाय

रंगकाम व्यवसायात काम करणाऱ्यांची संख्या भरपूर असली तरी या व्यवसायाची तंत्रशुद्ध माहिती घेऊन काम करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. घरांचे, इमारतींचे, कार्यालयांचे, सर्व वास्तूंचे स्वरूप झपाटय़ाने बदलत असून त्यात जास्तीत जास्त

 

आधुनिकता आणण्याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. या कामी रंगव्यवस्था हा खूप महत्त्वाचा घटक ठरत आहे. गगनचुंबी इमारती, ऑफिसेस, मोठमोठय़ा कंपन्या, मोठे शॉपिंग मॉल्स व घराची वाढती मागणी यामुळे बांधकाम क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कुशल रंगव्यावसायिकांची मागणी यापुढील काळात वाढणार आहे. विविध आधुनिक रंगकाम पद्धतीची तंत्रशुद्ध व प्रात्यक्षिकांवर आधारित माहिती प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे. रंगकामात वापरण्यात येणारे साहित्य, ब्रश, पत्रे, सेलर्स, शिडी, घोडा, झुला इत्यादींची माहिती, तसेच कलर स्कीप, शेड मॅचिंग, इमारतीचे अंतर्गत बाह्य़ डिझाइन, डेकोरेशन, पी.ओ.पी., फॉल सीलिंग, टेक्श्चर फिनिशिंग याची माहिती, रंगकामाच्या तांत्रिक माहितीबरोबरच मेजरमेंट काढण्यापासून ते कामाचे बजेट व कोटेशन कसे तयार करावे, तसेच रंगाचे विविध प्रकार (प्लास्टर, प्लास्टिक पेंट, सिमेंट पत्रे) रंग लावण्यापूर्वीची व नंतरची प्रक्रिया यांची माहिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्टय़ असणार आहे. रंगकाम व्यवसायातील वेगवेगळ्या संधी, मोठे काम मिळविण्यासाठी आवश्यक संभाषण कला, व्यावसायिक कौशल्ये, बाजारपेठ, मार्केट सव्‍‌र्हे, शासनाच्या विविध कर्ज योजना, अर्थसाह्य़, अनुदाने, प्रकल्प अहवाल, व्यवसाय व्यवस्थापन, अकाऊंट्स या माहितीचा अंतर्भाव या प्रशिक्षण कार्यक्रमात असणार आहे.
संपर्क- ९८१९०७०१६६/ ९३२५०७२००६.