Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

अर्धे शहर टँकरवरच!
नागपूर, २४ मे / प्रतिनिधी

पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर शहरातील पाणी टंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. भारनियमन आणि वारंवार जलशुद्धीकरण केद्रांत होणाऱ्या बिघाडामुळे जलकुंभाची पातळीही वाढत नसल्याने शहरातील अध्र्यावर वस्त्यांना सध्या केवळ टँकरच आधार ठरला आहे. २४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील मध्य, उत्तर, दक्षिण आणि पूर्व नागपूर या शहराच्या अध्र्या भागात गेल्या एक महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई आहे.

बंडोबांना वैदर्भीय जनतेने नाकारले!
नागपूर, २४ मे/ प्रतिनिधी

नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्याच्या सर्वच भागात विविध पक्षाचे बंडखोर उमेदवार उभे होते, मात्र अपवाद वगळता कुणालाच यश आले नाही. विदर्भातील नागपूर, गडचिरोली आणि भंडारा लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे भाजप आणि काँग्रेसच्या बंडोबांना पराभवच पत्करावा लागला. विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघापैकी नागपुरात भाजपसोडून गेलेले माणिकराव वैद्य हे बसपाचे उमेदवार होते, गडचिरोली मतदारसंघात भाजपमधूनच गेलेले राजे सत्यवानराव आत्राम यांनाही बसपानेच रिंगणात उतरविले होते.

योगिताच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी व्हावी
विदर्भ मोलकरीण संघटनेची मागणी
नागपूर, २४ मे/प्रतिनिधी

योगिताचा मृत्यू संशयास्पद असून, याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विदर्भ मोलकरीण संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. रूपा कुळकर्णी यांनी योगिताची आई विमल ठाकरे यांची नुकतीच भेट घेऊन विचारपूस केली.

दक्षिण नागपुरात पाण्याचा हाहाकार
वंजारीनगरात टँकर चालकाला मारहाण, संप
नागपूर, २४ मे / प्रतिनिधी

वंजारीनगरातील पाण्याच्या टाकीवर पुन्हा एकदा टँकर चालकाला मारहाण झाल्याने हनुमाननगर झोनमधील सर्व टँकर चालकांनी दुपापर्यंत पाणी वाटप न करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे दक्षिण नागपुरातील अनेक वस्त्यांना आज पाणी मिळू शकले नाही.

ऐन हंगामात खते, बियाणे टंचाईचा धोका
सुनील तिजारे, नागपूर, २४ मे

बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात लगबग वाढली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात त्याला अधिक वेग येणार आहे. सध्या ‘महाबीज’ आणि ‘अंकुर’ या कंपन्यांच्या बियाणांना शेतकऱ्यांची पहिली पसंती असल्याचे दिसून येते. दरम्यान, कपाशी (बी.टी.)बियाणे आणि खताच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने हंगाम सुरु झाल्यावर टंचाई जाणवण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. मृग नक्षत्रास सुरुवात होताच शेतकरी खरीप हंगामाची पेरणी करतात.

आजपासून रोहिणी नक्षत्र;
मृग वेळेवर ; बरसण्याची आशा
नागपूर, २४ मे / प्रतिनिधी

गेल्या आठवडय़ात विदर्भात झालेला वादळी पाऊस आणि त्यानंतर हवामान खात्याने यावर्षी वेळेत मान्सून येणार असल्याचा वर्तविलेला अंदाज या पाश्र्वभूमीवर उद्यापासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत आहे, नक्षत्राच्या आदल्या दिवशीच दिवसभर आकाशात ढंगांनी गर्दी केली होती. यंदा पाऊस चांगला येईल, या आशेने शेतकऱ्यांनीही त्यांच्या शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे.

शरद पवार यांचे राष्ट्रवादीतर्फे अभिनंदन
नागपूर, २४ मे / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत शरद पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, नवनिर्वाचित खासदार विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे, प्रफुल्ल पटेल आणि मुकुल वासनिक यांचेही अभिनंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष अशोक धवड होते. नगरसेवक हरीश ग्वालबंसी यांची महापालिकेच्या मंगळवारी झोनच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. शहरात सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अशोक धवड यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ९ वाजता पूर्व नागपुरातील वर्धमाननगर चौक आणि ९.३० वाजता दक्षिण नागपुरातील सक्करदरा चौकातून या अभियानास प्रारंभ करण्यात येणार आहे.

घोटकी सिंधी पंचायतच्या समाजभवनासाठी मदतीचे आवाहन
नागपूर, २४ मे / प्रतिनिधी

घोटकी सिंधी पंचायततर्फे बांधण्यात येत असलेल्या समाजभवनासाठी मदत करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष लालचंद खुशलानी यांनी केले . खुशलानी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची बैठक झाली, त्यात ते बोलत होते. समाजभवनासाठी साबाईबाई यांनी १५०० स्केअर फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. गेल्यावर्षी विजयादशमीनंतर समाजभवनाच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला असून जवळपास काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सुसज्ज असे सभागृह बांधण्यासाठी समाजातील लोकांनी मदत करावी, असे आवाहनही खुशलानी यांनी केले. यावेळी अर्जुनदास आहुजा यांचेही भाषण झाले. यावेळी गुरुमुखदास सचदेव, ओमप्रकाश बजाज, अशोक आर्य, यश कृपलानी, जानीमुल मुलचंदानी, चेटूराम दासवानी, बालचंद्र सेतिया, टिकमदास वासवानी आदी उपस्थित होते.

हरीश ग्वालबंशी यांचा सत्कार
नागपूर, २४ मे/प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या मंगळवारी विभागातील वार्ड समितीचे नवनिर्वाचित सभापती हरीश ग्वालबंशी यांचा सरस्वती बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी जास्तीतजास्त समस्यांची सोडवणूक करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून, विभागांतर्गत येणाऱ्या चौदाही वार्डांचा नगरसेवकांच्या सहकार्याने विकास करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष देवकुमार पाटील, उपाध्यक्ष भीमराव ताकतोडे, कोषाध्यक्ष जनार्दन ताकतोडे, सचिव संतोष ताकतोडे, सहसचिव संजय लिलहारे, सदस्य निखिल डुंभरे, शिवशंकर ताकतोडे, राकेश घुले, प्रमिला पाटील आदी उपस्थित होते.

तेली समाजाचा २१ जूनला परिचय मेळावा
नागपूर, २४ मे / प्रतिनिधी

साई मंगल मॅरेज ब्युरोतर्फे तेली समाजातील उपवर वधुवरांचा परिचय मेळावा रविवारी, २१ जूनला दुपारी ३.३० वाजता महालवरील शिक्षक सहकारी बँकेच्या ऑडिटोरियम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक राजीव गोल्हर व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल सोले राहतील. कार्यक्रमात स्लाईड शोद्वारे उपवर वधुवरांची छायाचित्रांसह माहिती देण्यात येईल. या कार्यक्रमाला फक्त नोंदणीकृत सभासदांनाच प्रवेश देण्यात येईल. नोंदणी १४ जूनपर्यंत करण्यात येईल.मेळाव्यात तेली समाजाचे लाईफ पार्टनर वधूवर सूचक पुस्तक समाजबांधवांसाठी उपलब्ध राहील. अधिक माहितीसाठी १५९, नंदनवन ले-आऊट, नागपूर येथे प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी २७४९५१७ भ्रमणध्वनी ९८२३७४७९१७ वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संचालक कृष्णा घुगुसकर यांनी केले आहे.

तुकडोजी महाराज अध्यासन; दोन कोटींचा निधी मंजूर
केल्याबद्दल शासन व कुलगुरूंचे अभिनंदन
नागपूर, २४ मे / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन स्थापन करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दोन कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आणि या कार्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांचे दुर्गाबाई रामभाऊ लुंगे स्मृती न्यास आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ, नंदनवन शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रसंतांच्या ग्रामोन्नतीबाबतच्या विचारांचा जनमानसामध्ये प्रचार व प्रसार होण्यासाठी राष्ट्रसंत अध्यासन निश्चितच बहुमोल कार्य करेल आणि त्यामुळे सुसंस्कारक्षम भावी पीढी निर्माण होईल. पर्यायाने सशक्त राष्ट्रनिर्मिती होईल, अशी आशा या संस्थेचे पदाधिकारी स्वातंत्र्य सैनिक नरसिंगराव चव्हाण, नामदेव करपे गुरुजी, डॉ. शांतीदास लुंगे, रजनी करपे, डॉ. मीनल खोंडे, योगेश लुंगे, स्नेहलता घोगरे, सौदामिनी लुंगे, बापुराव सोनारे, प्रा. शुभांगी लुंगे, मनीषा मंथनवार, गजानन बुरडे, अ‍ॅड. विजय मानमोडे यांनी व्यक्त केला आहे.

‘राष्ट्र पत्रिका’चे लोकार्पण
नागपूर, २४ मे/ प्रतिनिधी

हिंदी साप्ताहिक ‘राष्ट्र पत्रिका’चे शनिवारी नागपुरात माजी आमदार गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद, गिरीश मिश्र यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना गिरीश गांधी म्हणाले की, अलिकडे कोणत्ेाच वर्तमानपत्र सामान्य जनतेचा विचार करत नाही. ‘राष्ट्रपत्रिका’ने सर्वसामान्य जनतेचा आवाज होण्याचे ठरविले आहे. हीच भूमिका या साप्ताहिकाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. यावेळी साप्ताहिकाचे संचालक विश्वास नागपाल, ‘हितवाद’चे प्रबंध संपादक राजेंद्र पुरोहित, दैनिक ‘प्रतिदिन’चे मुख्य संपादक नानक आहुजा, समाज सेवी गोविंद पोद्दार, उद्योगपती पहलाज सच्चानी, दीपक लालवानी आदी मंडळी उपस्थित होती. प्रस्ताविक साप्ताहिक ‘राष्ट्र पत्रिका’चे संपादक पुष्पेंद्र फाल्गुन यांनी केली. संचालन नरेंद्र सतीजा यांनी केले.

सराफा व्यापाऱ्याला लुटले
नागपूर, २४ मे / प्रतिनिधी
मोटारसायकलवर आलेल्या दोन लुटारूंनी एका सराफाला लुटल्याची घटना कुकडे लेआऊटमधील मानवता हायस्कुलसमोर शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
प्रशांत विठ्ठल नेरकर (रा़ श्रीराम नगर) याचे कुकडे लेआऊटमध्ये सराफा दुकान आहे. दुकान बंद करून तो मोटार सायकलने (एमएच३१/एसी/८३५०) घरी जात होता. मानवता शाळेसमोरील मैदानाचे बाजूला दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार युवकांनी अडवून त्याला शस्त्राने जखमी केले. रोख दीड हजार रुपये, सोन्याचे मंगळसूत्र व चांदीच्या तोरडय़ा असा एकूण १२ हजार ३०० रुपयांचा ऐवज हिसकून पळून गेले. अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कारच्या धडकेने मोटारसायकलस्वार जखमी
नागपूर, २४ मे / प्रतिनिधी
वेगात जाणाऱ्या टाटा इंडिकाच्या धडकेने होंडास्वार तरुण जखमी झाला. मानेवाडा सिमेंट रोडवर शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. राजेश सोनकुसरे (रा. अजनी रेल्वे वसाहत) हा त्याच्या पत्नीसह हिरो होंडाने (एमएच ३१/एएक्स/२५७५) जात असता मानेवाडा सिमेंट रोडवर वेगात आलेल्या टाटा इंडिकाची (एमएच३१/सीए/२०७०) धडक लागली. या अपघातात जखमी झालेल्या राजेशला वैरागडे रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी कार चालकाविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.