Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

राज्य

खैरे-दानवे यांची हॅट्ट्रिक आणि मुंडे यांचे वर्चस्व सिद्ध
लक्ष्मण राऊत

मराठवाडय़ातील औरंगाबाद, बीड आणि जालना या तिन्ही मतदारसंघाच्या निकालाबाबत या वेळेस कमालीचे औत्सुक्य निर्माण झालेले होते. मागील पाचपैकी चार निवडणुकांमध्ये औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाला या वेळेस संत जनार्दन स्वामी मठाचे शांतीगिरी महाराज अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि त्यामुळे राजकीय गणिते बदलण्याची चर्चा सुरू झाली.

पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे संस्थापक अ. रा. कुलकर्णी यांचे निधन
पुणे, २४ मे / खास प्रतिनिधी
इतिहासाचे नामवंत अभ्यासक, पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे संस्थापक प्रमुख, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. अ. रा ऊर्फ अनंत रामचंद्र कुलकर्णी (वय ८४) यांचे आज सायंकाळी घशाच्या कर्करोगाने निधन झाले. डॉ. कुलकर्णी यांच्या मागे पत्नी विजया, सीमा व सविता या कन्या आणि मुलगा श्रीरंग असा परिवार आहे.

भुसावळ पालिकेत सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडण्याची चिन्ह
जळगाव, २४ मे / वार्ताहर

विकास कामाच्या मुद्यांवरून भुसावळ पालिकेतील सत्ताधारी शहर बचाव आघाडीमध्ये फूट पडल्याची चर्चा असून जूनमध्ये होणाऱ्या विशेष सभेसाठी आघाडीचे अध्यक्ष
तथा गटनेते मनोज बियाणी यांनी दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षादेश अर्थात व्हीप जाहीर केला आहे. शहर बचाव आघाडीला सत्तेत येऊन २५ जून रोजी
अडीच वर्षे पूर्ण होतील. नगराध्यक्षा संगीता बियाणी यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ याच वेळी संपणार असल्याने पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष निवडीकरिता जून महिन्यात
विशेष सभा बोलविण्यात येणार आहे.

येवला तालुक्यातील आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत
नाशिक, २४ मे / प्रतिनिधी

येवला तालुक्यात मागील आठवडय़ात वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना भुजबळ यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

भावी डॉक्टरांना अनावृत पत्र
आज तुम्ही सर्वजण अ‍ॅलॉपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी या विविध वैद्यकशाखांचे अभ्यासक्रम यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन वैद्यकीय पदवी धारण करणार आहात. ही पदवी घेतल्यानतंर तुमची नोंदणी त्या त्या विशिष्ट पॅथीच्या वैद्यक परिषदेकडे (कौन्सिलकडे) केली जाईल आणि डॉक्टर या नात्याने वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकृत परवाना तुम्हाला मिळेल. सर्व प्रथम तुम्हा सर्वाचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ! ज्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पदवी तुम्हाला मिळते आहे,

गटसचिवांचे आजपासून आंदोलन
मालेगाव, २४ मे / वार्ताहर

पूर्वापार चालत आलेली केडर पध्दत मोडीत काढून प्राथमिक सेवा संस्थांमधील गटसचिवांच्या नोकरीवर गंडातर आणण्याच्या शासकीय धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि गटसचिवांना सहकार आयुक्तांच्या अधिपत्याखाली कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी राज्यातील नऊ हजारपेक्षा अधिक गटसचिव २५ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती सहकारी संस्था सचिव कर्मचारी युनियनचे नाशिक जिल्हाध्यक्ष सखाराम पाटील यांनी दिली. गटसचिवांवरील अन्यायाविषयी शासन पातळीवरून उदासिनता दाखविण्यात येत असल्याचा आरोप करून हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही पाटील यांनी दिला. शेतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने प्रा. वैद्यनाथन समितीच्या शिफारशीवरून ‘पॅकेज’ देतांना राज्य सरकारशी केलेल्या करारानुसार सचिवांची नेमणुक व सेवाशर्तीसाठी सध्या अस्तित्वात असलेली केडर यंत्रणा रद्द करण्याची अट घालण्यात आली होती. या नव्या पध्दतीत अनेक वर्षे सेवेत असलेल्या सचिवांची सेवा धोक्यात येणार असल्याने गेल्या दोन वर्षांपासून सचिवांच्या संघटनेने शासनदरबारी त्यास विरोध सुरू केला आहे. सध्याची केडर पध्दत रद्द केली तर अनेक गुंतागुंत निर्माण होऊन संस्था रसातळाला जातील आणि पर्यायाने ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना पतपुरवठय़ापासून वंचित व्हावे लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

धुळे जिल्ह्य़ात राशी-२ कापूस बियाणाची वानवा
धुळे, २४ मे / वार्ताहर

शहरातील बियाणांच्या दुकानांमध्ये राशी-२ हे कापूस वाण शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत:च्या अनुभवावरून इतर वाणाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. डी. मालपुरे यांनी केले आहे. जिल्ह्य़ात खरिप हंगामास सुरूवात झाली असून बियाणे, रासायनिक खते, किटकनाशकांची खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना कृषी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी, तक्रारी यांची वेळीच दखल घेवून तातडीने उपाय योजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातंर्गत जिल्हास्तरीय गुणवत्ता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहितीही मालपुरे यांनी दिली. नियंत्रण कक्ष १७ जुलैपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी कृषी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके उपलब्धतेसंदर्भात काही तक्रारी असल्यास ०२५६२-२३८१८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.