Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

शेतीवाडी

सुगंधी वनस्पती लागवड व तेल उत्पादन
महाराष्ट्रातील हवामान व जमिनीचे प्रकार लक्षात घेता महाराष्ट्रात स्रिटोनेला, लेमनग्रास, पामारोजा, नागरमोथा, दवणा, जिरॅनियम, वाळा, निलगिरी, पुदिना व तुळस या सुगंधी वनस्पतींची व्यापारी तत्त्वावर लागवड करता येईल. उष्ण, अतिउष्ण, समशीतोष्ण थंड असे निरनिराळे हवामान आपल्याकडे असल्यामुळे, सूर्यप्रकाश, तापमान, आद्र्रता, पाऊस, धुकं, ढगाळ वातावरण इत्यादींचा विचार करून लागवडीसाठी वनस्पतींची निवड करावी. वनस्पतींच्या लागवडीची वेळ आणि हंगाम तसेच लागवडीची पद्धत, रोपातील व ओळीतील अंतर इत्यादीची माहिती द्यावी. पिकाची पाण्याची गरज, पाण्याच्या पाळ्या, पाण्याची उपलब्धता पाहावी. तसेच कमी-जास्त पाण्याचे पिकावर होणारे परिणाम अभ्यासावेत. उत्तम प्रतीचे बेणे निवडणे, ज्या योगे जास्तीत जास्त व निरोगी रोपे लागवडीखाली येतील. सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचे दर एकरी प्रमाण व वेळ ठरवून दर एकरी जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल ते पाहणे.

खतासाठी यंदाही..
स्वा तंत्र्यानंतर प्रत्येक निवडणुकीत वीज, पाणी, रस्ते याचीच चर्चा होते मात्र गेल्या ६० वर्षांत या प्राथमिक गरजाही भागलेल्या नाहीत. केवळ निवडणुकीत आश्वासने देऊन वेळ मारून नेली जाते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकारण्यांनी मूळ प्रश्नाला बगल देत आश्वासनांची धूळफेक करण्यात धन्यता मानली. बी-बियाणे, खते, कीटकनाशके चांगल्या दर्जाची व पुरेशी उपलब्ध व्हावीत इतकी शेतकऱ्यांची माफक मागणी आहे. मात्र बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित जोपासत स्वत:चे खिसे भरण्यासाठी येथील भूमिपुत्राला नागवण्याचे काम अखंडपणे सुरू आहे.

ग्रीन जॉईंट व्हेंचर
शे तमालाच्या उत्पादनवाढीसाठी जगभर मंथन कायम चालू असले तरी आता नव्या पद्धतीने विकासाचा वेग गाठण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. शेतात पिकणारा माल बाजारात जाईपर्यंत वाहतुकीची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची. वाहतुकीची व्यवस्थित सोय असेल तर तो माल योग्य वेळेत व योग्य अवस्थेत बाजारात पोहोचू शकतो. त्यासाठी आवश्यक असतात उत्तम रस्ते. त्या रस्त्यांवरील इतर वाहतूक अडथळा ठरणार नाही, याची काळजीही तितकीच महत्त्वाची. त्या दृष्टिकोनातून विचार करता आपल्याकडे खडखडीत कच्च्या रस्त्याने एखाद्या शेतकऱ्याचा टोमॅटो मोटारीतून आणला जात असेल तर तो बाजारात पोहोचेपर्यंत निम्मा-अर्धा ढिला किंवा बिलबिलीत झाल्याशिवाय राहणार नाही. अशा रस्त्यांनी फळांची वाहतूकही तितकीच धोकादायक.

जैवइंधन उद्योगाला फटका
नैसर्गिक साधनसंपत्तीच्या घटत्या प्रमाणामुळे नवे मार्ग शोधण्यात येऊ लागले. गेल्या काही वर्षांमध्ये जैव इंधनाचा वापर वाढविण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे देशोदेशी जैविक इंधनासाठी लागणारा कच्चा माल देणारी पिके घेण्याचा सपाटा लावण्यात आला. जैवइंधनासाठी अशी पिके घेताना त्याला ना शिस्त, ना नियम. काही देशांनी तर धान्याचा वापर इंधनासाठी केला तर काही देशांनी धान्याच्या पिकाखालील जमीन जैविक इंधनाच्या पिकासाठी करण्यास सुरुवात केली. परिणाम व्हायचा तोच झाला. जगभर अन्नधान्याचे भाव कडकू लागले. गरिबांना अन्न विकत घेणे अवघड होऊ लागले. आता पर्यावरणीय संरक्षण यंत्रणेने (इन्व्हायर्न्मेंन्टल पट्रोक्शन एजन्सी- इपीए) आपल्या प्रस्तावित नियमात जमीन वापराच्या बदलाचा मुद्दा समाविष्ट केला आहे. त्यामुळे जैविक इंधन उद्योगांपुढे एक समस्या उभी राहिली आहे.

हमालही शेतकरीच
प्रतिसाद

‘शे तीवाडी’मधील सोमवार, दि. ११ मे २००९ रोजीचा ‘बाजार समित्यांमध्ये शोषणच’ हा प्रा. डॉ. सुरेश जगताप यांचा लेख वाचला. या लेखासंदर्भात पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट कामगार यार्ड कामगार युनियनच्या वतीने मी नमूद करतो, की या लेखातील मतांबाबत कोणतेही दुमत नाही. लेखातील मते ७० ते ८० टक्के सत्य आहेत. आम्ही सर्व हमाल कामगार शेतकरी कुटुंबातीलच असून, गावाकडे शेतीवर भागत नसल्याने येथे हमाली काम करीत आहोत. मात्र लेखात उल्लेख केल्याप्रमाणे दलालांबरोबर आम्हाला जोडून काय मिळाले? शेतकऱ्यांचे शोषक व दलाल कोण हेच मुळात नीटसे समजलेले नाही.