Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

११ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

शहर पोलिसांनी सोमवारी विविध कलमान्वये ११ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली

 

तर जुगार खेळणाऱ्याएका आरोपीला अटक केली.
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०७ अन्वये ६, ११० अन्वये १, १५१ अन्वये १, ४१ अन्वये ३ असे एकूण ११ आरोपींवर कारवाई करण्यात आली. दारूबंदी कायद्यांतर्गत दोन आरोपींना अटक करण्यात आली. नाकाबंदीत १ हजार ७१४ वाहनांची तपासणी करून १० चालकांना चालान केले. वाहतूक पोलिसांनीही मोटारवाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत ४९३ वाहनचालकांवर कारवाई करून एकूण ८३ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल केले. जादा प्रवासी वाहतूक, कॉर्नर पारंग, बस थांब्याजवळ पार्किंग, सिग्नल तोडणे, कर्कश हॉर्न, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, मर्यादेपेक्षा जास्त गती आदींप्रकरणी ही कारवाई झाली. तीन आसनी ऑटो रिक्षा २, सहा आसनी ऑटो रिक्षा १, दुचाकी- ४, चारचाकी ४ अशी एकूण ११ वाहने डिटेन करण्यात आली़
मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ७२ चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहनचालकांनी वाहन चालवताना कागदपत्र सोबत ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.