Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

महिलेच्या खात्यातील रक्कम परस्पर काढणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

बनावट स्वाक्षरीने धनादेश सादर करून महिलेच्या खात्यातील दोन लाख रुपये

 

हडपल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मतीन अहमद, मुश्ताक अहमद अन्सारी, शेख इमरान युसूफ व प्रशांत अशोक मेहरा ही आरोपींची नावे आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या किंग्जवे शाखेत विमल प्रतापसिंह राठोड यांचे खाते आहे.
आरोपींनी त्यांच्या बनावट स्वाक्षरीने चेकबुक मिळवले. त्यानंतर बनावट स्वाक्षरी करूनपंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईव नागपूर शाखेत २ लाख २ हजार रुपयांचे चेक सादर केले आणि रक्कम उचलली. ८ ते १३ एप्रिल या कालावधीत हा प्रकार घडला. बँकेच्या किंग्जवे शाखेचे मुख्य व्यवस्थापक कृष्णा रामचंद्र पळसोदकर यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुचाकी चोर अटकेत
सक्करदरा पोलिसांनी एका दुचाकी चोरास अटक करून त्याच्याजवळून चोरीची हिरो होंडा जप्त केली. हरीष गौरव मडावी (रा. सोमवारी क्वार्टर) हे त्याचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर सक्करदरा पोलीस ताजबाग परिसरात गस्त घालत असताना त्यांना हरीष हिरो होंडासह दिसला. राजेश श्रावण बारई (रा़ जुना बगडगंज) यांची ही हिरो होंडा असून (एमएच३१/बीए/५५३२) हे वाहन त्याने आयुर्वेदिक रुग्णालयातून चोरल्याची कबुली दिली.
लोखंडी वस्तूंसह आरोपींना अटक
सीताबर्डी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून ५० किलो लोखंडाच्या वस्तू जप्त केल्या. पोलीस नियंत्रण कक्षाकडून सूचना कळताच सीताबर्डी पोलीस आरटीआे कार्यालयासमोर पोहोचले. तेथे संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या दिलीप शाम वानखेडे व रोशन रमेश नारनवरे ( दोन्ही रा़ आंबेडकर नगर वाडी) यांना पकडले.
लोखंडी खिडक्या, लोखंडी रॉड, जर्मन पात्याचे पंखे व लोख्ांडी सळया असा एकूण ५० किलो ऐवज (किंमत ४ हजार ५०० रुपये) जप्त केला.