Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

कोराडीत मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह
कोराडी, २६ मे / वार्ताहर

शासनातर्फे कोराडी-नांदा येथे मागासवर्गीय मुला-मुलींसाठी वसतिगृह मंजूर झाले असून

 

त्याच्या बांधकामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या वसतिगृहाच्या बांधकामासाठी पाच कोटी रुपये खर्च होणार आहेत. कोराडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नांदा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ बांधण्यात येणाऱ्या या वसतिगृहात ८०० विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था राहणार आहे.
वसतिगृह झाल्यानंतर कोराडी, महादुला, खापरखेडय़ासह अन्य भागातील मागसवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहून शिक्षण घेणे सोयीचे होणार असल्याचा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. हा भाग मागास म्हणून ओळखला जातो. या भागात अनेक शाळा, महाविद्यालये असूनही वसतिगृहाची सोय नव्हती. परिणामी इच्छा असतानाही हुशार मुले शिक्षण घेऊ शकत नव्हती.
पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राजेश रंगारी, पंचायत समिती सदस्य संजय मैंद, विणा भोगे, योगेश्वर मानवटकर, महादुल्याचे उपसरपंच पंकज ढोणे, श्रीरंग यादव, युवराज गोडबोले प्रामुख्याने उपस्थित होते.