Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

गांधी शिल्प बाजारचे उद्घाटन;१६ राज्यातील शिल्पकार सहभागी
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

गांधी शिल्प बाजार २००९चे उद्घाटन नुकतेच विभागीय निर्देशक ए.आर. चौधरी यांच्या

 

हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक निर्देशक एस.झेड. हुसेन, उपसंचालक ए.टी. मेश्राम, सहाय्यक संचालक एस.आर. मसराम, जेनेकर, श्रीकांत देशपांडे, आंबेकर, संस्थेचे सचिव अब्दूल जब्बार शेखजी, अध्यक्ष मेहबूब खान, दुर्गाप्रसाद नरबरीया, शेख रहीम, अब्दुल सलीम, युसुफ खान, प्रिती पेठे उपस्थित होते.
गांधी शिल्प बाजारात सुमारे १६ राज्यातील शिल्पकारांनी त्यांच्या कलाकृती सादर केल्या आहेत. सहारनपूर येथून फर्निचर, ड्रेस मटेरियल, ड्राय फ्लॉवर, टेराकोटा, हैदराबादी ड्रेस, ब्लॉक प्रिंटींग, बेडशिट, जुट ज्वेलरी, कोल्हापुरी चप्पल आदी कलाकृतींचा प्रदर्शनात सहभाग आहे. प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी मोठय़ा संख्येने नागपूरकरांनी भेट दिली. ३१ मे पर्यंत चालणारे हे प्रदर्शन नि:शुल्क असून नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.