Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

रेतीचा अवैधरीत्या उपसा;नदीपात्रातून ७ ट्रक जप्त
नागपुर, २६ मे / प्रतिनिधी

खापरखेडा नजीकच्या बाभूळखेडा पहाडी भागात कोलार नदीच्या पात्रातून रेतीचा अवैध

 

उपसा करणाऱ्यांवर सावनेरच्या तहसीलदारांनी कारवाई केली. या कारवाईत सात ट्रक जप्त करण्यात आले.
कामठी व सावनेर तालुक्यातील नदीपात्रातून रेतीची सर्रास चोरी होते. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच नदीपात्रातून रेतीचा उपसा करता येतो. परंतु बाभूळखेडा येथील कोलार नदीच्या पात्रातून प्रामुख्याने रात्रीच्या सुमारास उपसा केला जात होता. या प्रकरणात जिल्ह्य़ातील रेती माफिया अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जप्त केलेल्या ट्रकपैकी ३ ट्रक रेतीने भरलेले होते तर ४ ट्रक नदीपात्रात रेती भरण्यासठी उभे ठेवण्यात आले होते. परंतु, याच सुमारास महसूल अधिकाऱ्यांनी छापा मारल्याने ही चोरी उघडकीस आली. रेती माफियांची दहशत लक्षात घेता कारवाई करताना खापरखेडा पोलिसांची मदत घेण्यात आली.