Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

भूदेव वांढे ‘राष्ट्रीय गौरव’ पुरस्काराने सन्मानित
कोराडी, २६ मे / वार्ताहर

महादुला-कोराडी येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष भुदेव वांढे यांना उल्लेखनिय कार्याबद्धल

 

पुणे येथे पार पडलेल्या एका समारंभात ‘राष्ट्रीय गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यवतमाळ येथील समता साहित्य अकदामीतर्फे वांढे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर झाला होता. पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात नुकत्याच पार पडलेल्या समारंभात माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते वांढे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी आमदार रामदास तडस, समता साहित्य अकादमीचे अध्यक्ष देवानंद तांडेकर, अरुण राऊत, दत्तात्रय धुमाळ, भारती तांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
समता साहित्य अकादमीतर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्धल वांढे यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्धल महादुला-कोराडी व्यापारी संघटना, महादुला बीगर शेती व संस्था, जय भोले बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वांढे यांचे अभिनंदन केले आहे.