Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

जिल्ह्य़ात राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेची अंमलबजावणी
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

केंद्र पुरस्कृत दारिद्य्र रेषेखालील राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्य़ात

 

करण्यात येत असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त मिलिंद जानराव यांनी कळवले आहे.
असंघटित क्षेत्रातील दारिद्य्ररेषेखालील कामगारांच्या कुटुंबातील ५ लोकांना वैद्यकीय लाभासाठी पात्र ठरवले जाणार आहे. वर्षभरासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी सुमारे ३० हजार इतकी रक्कम राहणार आहे.
राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेसाठी लाभार्थ्यांस कोणत्याही प्रकारची रक्कम रुग्णालयात भरावी लागणार नाही. रुग्णालयात भरती होण्यापूर्वी १ दिवस व भरती झाल्यानंतर ५ दिवसाठीचा खर्च लाभार्थ्यांस देय राहील. रुग्णास दवाखान्यात नेण्या व आणण्यासाठीचा खर्च जास्तीतजास्त १०० रुपये मिळेल. हा खर्च वर्षभरात १ हजार रुपयापेक्षा जास्त दिला जाणार नाही.
बाह्य़ रुग्णांसाठी योजना लागू नाही. शासकीय रुग्णालये व खाजगी पात्र रुग्णालये या योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवणार आहेत. रुग्णालयाची निवड न्यू इंडिया इन्शुरन्स ही विमा कंपनी करेल. या योजनेत ७२५ प्रकारच्या विकारांवर उपचार करण्यात येणार आहे.