Leading International Marathi News Daily
बुधवार, २७ मे २००९
  ब्युटी
  ध्यास सौंदर्याचा!
  चीफ अकाऊंटन्ट
  ‘लॉजिस्टिक्स’मध्ये एमबीए करण्यासाठी शिष्यवृत्ती
  कर्तृत्वाचे फळ
  संशोधन अहवालाचे लेखन
  ‘कॅग’ कार्यालयात डेटा एंट्री ऑपरेटर
  ब्युटी इंडस्ट्री तरुणाईची
  नवा अभ्यासक्रम: ‘इंडियन आर्टस् इन फॅशन’
  रशियातील वैद्यकीय शिक्षणासाठी बहुमोल सल्ला
  दहावी नंतर काय?
  सौंदर्यशास्त्राचा परीघ

सौंदर्यशास्त्रज्ञ हा त्वचा, चेहरा, मायक्रोडर्मोब्रेशन, शरीराची काळजी, मेकअप यासारख्या सगळ्या घटकांमध्ये निष्णात असतो. असे हे शास्त्रज्ञ एखाद्या डॉक्टरला मदत करू शकतात किंवा स्वत:ची प्रॅक्टिस करू शकतात एवढंच नाही तर स्वत:चं सलून, स्पा चालू करू शकतात. डॉक्टरबरोबर काम करत असताना त्वचेच्या ट्रीटमेंटसाठी कोणी तरी अनुभवी माणूस मार्गदर्शनासाठी असल्यामुळे या सौंदर्यशास्त्रज्ञांना त्याचा उपयोग होतो.
शिक्षण, प्रमाणपत्रकामार्फत मिळणारी शिक्षणाची पावती आणि सातत्य या तीन गोष्टी कोणत्याही सौंदर्यशास्त्रज्ञासाठी महत्त्वाच्या ठरतात कारण लोकांना सुंदर करण्याव्यतिरिक्त त्यांना मानवतील, अशी सौंदर्य प्रसाधनं सुचवणं आणि विकणं हेही महत्त्वाचं ठरतं.
आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या प्रमाणपत्राचे महत्त्व : त्वचा, तिचे घटक आणि त्यासाठी वापरण्यात येऊ शकणारं तंत्रज्ञान यामध्ये जगभरातले सौंदर्यशास्त्रातले अनेक दिग्गज काम व नवनवीन संशोधन करत आहेत. सुशिक्षित व माहितीपूर्ण व्यासंग असणारा सौंदर्यशास्त्रज्ञ व्यावसायिक नातेसंबंध, क्लायंट्सची काळजी आणि एक त्वचा संगोपनतज्ज्ञ म्हणून खूप चांगल्या रीतीने काम करू शकतो. आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र असलेला सौंदर्यशास्त्रज्ञ अधिक चांगले सल्ले देऊ शकतो आणि त्याची विश्वासार्हताही कमालीची वाढते.
या सगळ्यांचा चांगला परिणाम हा त्या सौंदर्यशास्त्रज्ञाकडे येणाऱ्या क्लायंट्सवर होतो. त्यांना या उच्च शिक्षणाचे लाभ मिळतात, भारतासारख्या देशामध्ये यापुढे अशा आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेशनची निकड वाढणार आहे.
एल. टी. ए. सर्टिफिकेशन (प्रमाणपत्रीकरण) :
जगभरात सिडेस्को (CIDESCO) चं प्रमाणपत्र खूपच मान्यता मिळवलेलं आहे. एल.टी.ए. या सौंदर्य प्रशिक्षण संस्थेने
 

आता भारतामध्येही या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राचं महत्त्व वाढवण्याच्या आणि रुजवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. सिडेस्कोशी संलग्न असणाऱ्या थोडक्या भारतीय संस्थांमध्ये एल. टी. ए.चा समावेश होतो. प्राथमिक आणि अ‍ॅडव्हान्सड् सौंदर्य चिकित्सा प्रात्यक्षिकं व अजून एक विषय अशी या अभ्यासक्रमाची रचना आहे. शरीर रचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, त्वचा, नॅचरल सायन्स, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, विद्युतशास्त्र, कॉस्मेटिक सर्जरी, आहारविज्ञान व व्यावसायिक तत्त्व यासारखे विषय या कोर्समध्ये शिकवले जातात. थिएरीव्यतिरिक्त स्कीन क्लिन्सिंग, मसाज, चेहऱ्याची विद्युत चिकित्सा आणि हाय फ्रिक्वेन्सी, ब्रशिंग गॅल्वानिक, मायक्रो करंट यासारख्या यंत्रांचा वापरही शिकवण्यात येतो.
प्रमाणित सौंदर्यशास्त्रज्ञ व चिकित्सक- काळाची गरज :
हा उद्योग जसजसा मोठा होत चाललाय तसतशी उच्चशिक्षित व्यावसायिकांची गरजही वाढत चालली आहे. स्पा, सलून्स, मेडी-स्पाज या सर्व ठिकाणी प्रशिक्षित सौंदर्यशास्त्रज्ञांची गरज वाढत चालली आहे. डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या अनेकांना आज सौंदर्यशास्त्रज्ञांची गरज लागत आहे. डर्मेटोलॉजिस्ट व प्लॅस्टिक सर्जन्सकडे अशा अनेक संधी सौंदर्य चिकित्सकांसाठी उपलब्ध आहेत. फेशियल, मसाज, बॉडी रॅप्स, केमिकल पिल्स, मेकअप, केस कापणे या व इतर अनेक सेवा देणं हे एका सौंदर्य चिकित्सकांचं काम असतं. याबरोबर सौंदर्य प्रसाधनांची विक्री व सल्ला देण्याचं कामही हे प्रशिक्षित चिकित्सक करू शकतात. स्वत:चं पार्लर चालवणं हा एकच परंपरागत पर्याय जाऊन त्याबरोबर स्पा मॅनेजर, खासगी सल्ला देणारा प्रॅक्टिशनर यासारखे अनेक नवनवीन जॉब्ज आज उपलब्ध आहेत.
प्रगतीमधला उत्प्रेरक म्हणून एल. टी. ए.चा वाटा :
क्लिनिकल अ‍ॅस्थेटिशियन (सौंदर्यशास्त्रज्ञ व चिकित्सक) बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एल. टी. ए. व तत्सम अनेक संस्था आज कार्यरत आहेत. भारतात सौंदर्य चिकित्सेची गरज वाढवण्यासाठी व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण भारतात आणण्यासाठी एल. टी. ए. कायमच प्रयत्नशील राहिलं आहे. मुंबईत अंधेरीमध्ये अत्याधुनिक व अद्ययावत प्रशिक्षण केंद्रही उभारलं आहे. त्यांच्याकडे उच्च प्रतीचे शिक्षक व साधनं उपलब्ध आहेत. सिडेस्को व सिबटॅक (CIBTAC) डिप्लोमा असणारी एल. टी. ए. ही भारतातील मोजक्या संस्थांमध्ये मोडली जाते. या संस्थेच्या अभ्यासक्रमामुळे सौंदर्यकार हा खऱ्या अर्थाने सौंदर्यशास्त्रज्ञ बनू शकेल, असं या संस्थेचं म्हणणं आहे.
संपर्क- एल. टी. ए. स्कूल ऑफ ब्युटी, ए २०१/ १०२, प्रार्थना स्टार, सहार रोड, अंधेरी स्टेशनजवळ, मुंबई- ६९. Office@ltaindia.org ३२५७३०३२/ ६५२००४७९/ ९२२३२२२४३०.
अनेक संधी प्राप्त करून देणारं करिअर :
मान्यतापात्र, मान असणारं व त्याचबरोबर नोकरीची हमी देणारं करिअर निवडणं हा महत्त्वाचा निर्णय असतो. सौंदर्य क्षेत्रातल्या संधी आज अनेकांना खुणावत आहेत. सौंदर्याबद्दल जागरूकता व सौंदर्य जपण्याची वाढती गरज यामुळे मंदीच्या काळातही हा व्यवसाय तग धरून आहे. ब्युटी लवून, स्पाज् यांच्या वाढत्या संख्येमुळे ही गोष्ट प्रकर्षांने जाणवत आहे. सौंदर्योपचार हे तर आपल्या रोजच्या जीवनाचा घटक झाले आहेत ज्यामुळे या व्यवसायाकडे मानाने पाहिलं जातंय. यामुळेच इतर क्षेत्रांतले व्यावसायिकही सौंदर्य क्षेत्राकडे वळायला लागले आहेत.
क्लॅरिअन कॉस्मेटिक्सची एक शाखा एल. टी. ए. स्कूल ऑफ ब्युटी ही आता सौंदर्य प्रशिक्षण क्षेत्रात पदार्पण करत आहे. उच्च दर्जाचे सौंदर्य प्रशिक्षण देणे हे एल. टी. ए.चे ध्येय आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक व संसाधनं यासाठी वापरली जात आहेत.
याचबरोबर सिडेस्की व सिबटॅकची मान्यताप्राप्त व मानाने प्रमाणपत्र कोर्स एल. टी. ए. चालवत आहेत. जॉब प्लेसमेंट्स तसेच बँक लोनच्या सोयीही एल. टी. ए.चे हे कोर्स देतात.
ब्युटी थेरपिस्ट अभ्यासक्रमाचे प्रारूप
१) त्वचाशास्त्र समजणे.
- त्वचेची बांधणी.
- प्रकार व कामे.
- अ‍ॅनलिसिस.
२) ब्युटी थेरपिस्टची गरज, कामे व शिष्टाचार समजणे.
३) स्वत:ची व सलूनची स्वच्छता व आरोग्य.
४) एपिलेशन.
- केस काढणे.
- वॉक्सिंग, थ्रेडिंग, ट्वीझिंग.
५) पाय व हाताची ट्रीटमेंट
- एक्स्फोटेशन.
- मसाज.
- इनेमलिंग.
- आफ्टरकेअर.
६) चेहरा व त्वचा
- क्लिन्झिंग.
- स्टीमिंग.
- एक्सोलेशन (स्क्रब्स)
- ब्लिचिंग.
- मसाज.
- मास्क लावणे.
- आफ्टरकेअर.
क्लिनिकल अस्थेटिशियन : (सिबटेक)
१) आरोग्य व स्वच्छता.
२) त्वचा रचना व कार्य.
३) त्वचा रोग.
४) शरीररचनाशास्त्र व शरीरकार्यशास्त्र.
५) चेहऱ्याची काळजी.
६) स्कीन अ‍ॅनलिसिस
७) मसाज.
८) मास्क.
९) इलेक्ट्रोथेरपी.
१०) आफ्टरकेअर.
११) मेकअप.
१२) कॉस्मेटिक शास्त्र.
हेअर प्रोफेशनल:
१) केस- रचना, घटक, प्रकार, रोग, स्वच्छता.
२) शॉम्पू व कंडिशनर लावणे- मसाज, ब्लो ड्राय, केश कर्तन, स्टायलिंग.
३) केशकर्तक- बेसिक, स्टायलिंग.
४) केमिकल ट्रीटमेंट्स- कलरिंग.
५) पर्मिग व रिलाक्सेशन.
६) केसांचे रोग- डँड्रफ, केस गळणे, बाँडिंग, कलरिंग, इन्फ्रारेड, स्टीमर.
प्राजक्ता कुवळेकर
संपर्क: ९००४३५०६१८