Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

व्यापार-उद्योग

मुंबईत आजपासून ‘रूफ अ‍ॅण्ड क्लॅडिंग इंडिया २००९’ प्रदर्शन
व्यापार प्रतिनिधी

 

घर-इमारतींचे छप्पर, क्लॅडिंग आणि पूरक तंत्रज्ञानावर आधारीत आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन ‘रूफ अ‍ॅण्ड क्लॅडिंग इंडिया २००९’ या नावाने मुंबईत गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे २८ ते ३० मे २००९ दरम्यान योजण्यात आले आहे. चेन्नईस्थित युनिटेक एक्झिबिशन्स प्रा. लि. या कंपनीने या प्रदर्शनाचे आयोजन केले असून, अमेरिकेच्या नॅशनल रूफिंग कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, टेन्सिनेट असोसिएशन (बेल्जियम) आणि इंटरनॅशनल टेन्सिल मेम्ब्रेन्स असोसिएशन अशा संघटनांचे या प्रदर्शनाला प्रायोजकत्व लाभले आहे.
चीनमधील चायना नॅशनल वॉटरप्रुफ बिल्डिंग मटेरियल्स इंडस्ट्री असोसिएशननेही या प्रदर्शनाला पाठबळ दिले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील रूफिंग सिस्टीम, आर्किटेक्चरल क्लॅडिंग, मेटल बिल्डिंग सिस्टीम्स/ प्री-इंजिनीयर्ड बिल्डिंग्ज आदी क्षेत्रातील ७० हून अधिक कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. स्पेसफ्रेम स्ट्रक्चर्स, स्कायलाइट आणि डोम्स, वॉटरप्रुफिंग, इन्सुलेशन यांचे खास नमुने त्याचप्रमाणे रूफिंग मशीनरी, रूफिंग फास्टनर्स या क्षेत्रातील अद्ययावत उत्पादनेही या ठिकाणी पाहायला मिळतील.