Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९


सिटी वॉक
रेल्वे इंजिनांचे जन्मघर परळमध्ये..

रेल्वे इंजिने बनविण्याचा भारतातील एकमेव कारखाना ..... या ठिकाणी आहे. ‘गाळलेल्या जागा भरा’ यासाठी शालेय क्रमिक अभ्यासक्रमात हमखास येणारा प्रश्न म्हणून अनेक वर्षे लहान मुलांनी ते पाठही केले आहे. ‘चित्तरंजन’ हे लहानपणी पाठ केलेले उत्तर नंतर दीर्घकाळ स्मरणात असते. पण आता मध्यंतरीच्या काळात बरीच वर्षे गेली. काळ बदलला आणि रेल्वेची इंजिने तर आता अगदी इथे या महामुंबईतच तयार होऊ लागली आहेत. पण आजही फारशा मुंबईकरांना त्याची तसूभरही कल्पना नाही. एरवी मध्य रेल्वेचे परळ स्थानक गाडीने सोडल्यानंतर किंवा पश्चिम रेल्वेने प्रवास करत असाल तर एल्फिन्स्टन रोड स्थानक सोडल्यानंतर लगेचच डावीकडे मध्य रेल्वेचे परळ वर्कशॉप किंवा परळ कारखाना दिसतो. क्वचित प्रसंगी तिथे आत जाणारी आणि बाहेर येणारी इंजिने किंवा मग रेल्वेचे डबे पाहायला मिळतात. मात्र आत काय चालले आहे, त्याचा नेमका अंदाज आपल्याला बाहेरून येत नाही. कारण आपण आणि कारखान्याचा आतील भाग यात एक मोठी भिंत येते. नेहमी येथून जाणाऱ्यांना आणि खास करून रेल्वे प्रवास करणाऱ्यांना तर या परळ कारखान्याविषयी एक सुप्त आकर्षण बरीच वर्षे आहे.

विवाहविषयक ज्योतिष प्रश्नांची माहिती
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘जोडी जमली रे’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये गुरुवारी रात्री १० वाजता दाखविण्यात येणाऱ्या भागात अनेक धमाल इंटरॅक्टिव्ह खेळ, ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट’ याबरोबरच मनोरंजनपर गोष्टींचाही समावेश करण्यात आला आहे. विवाहामुळे दोन जीव, दोन मने आणि त्यांची कुटुंबे यांचे नाते जुळते. म्हणूनच लग्न जुळवताना वधू व वर या दोघांचीही जन्मपत्रिका पाहिली जाते. त्यातील दोष कमी करण्यासाठी, अनिष्ट ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपासना तसेच धार्मिक विधी केले जातात. या सर्वच गोष्टींबद्दल कार्यक्रमात सहभागी झालेले ज्योतिषी पंडित संदीप अवचट सविस्तर माहिती देतील. गुरुवारच्या भागात ते मंगळ दोष यावर माहिती सांगून स्पर्धकांची मते जाणून घेतील. मंगळ दोष म्हणजे काय, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, त्यावर कोणती उपाययोजना करता येते यांसारख्या गोष्टी सांगण्यात येतील. त्यामुळे स्पर्धक तरुण-तरुणींबरोबरच ‘जोडी जमली रे’ कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांमधील उपवर आणि उपवधू तसेच त्यांच्या पालकांनाही पं. संदीप अवचट मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय ‘कुंभ विवाह आणि अर्क विवाह’ या विषयावरही ते माहिती देणार आहेत.
प्रतिनिधी