Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

महाराष्ट्राच्या ‘नवरत्नां’मध्ये प्रतीक आणि विलासरावांचा समावेश अनपेक्षित
नवी दिल्ली, २७ मे/खास प्रतिनिधी

केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या ‘नवरत्नां’मध्ये वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा समावेश झाल्यामुळे सर्वांनाच अनपेक्षित धक्का बसला. सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत प्रतीक पाटील यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या विरोधात सारी राजकीय ताकद एकवटली होती, तर निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विलासराव देशमुख यांची कुठल्याही परिस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू नये म्हणून राज्यातील बहुतांश नेत्यांनी मोर्चेबांधणी केली होती.

व्यापक मान्यतेसाठी कम्युनिस्टांची प्रतिमा बदलायला हवी
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आघाडीला जे यश मिळाले, त्यात ‘मनसे’चा वाटा मोठा असल्याचे म्हटले जाते. मुंबईतल्या तीन जागा, तसेच नाशिक व पुण्याच्या जागांबाबत हे खरे असले, तरी दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड व उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त यांचे यश निर्विवाद आहे, हीदेखील वस्तुस्थिती आहे.

केंद्रात मंत्रीपद द्या! -रामदास आठवले
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

शिर्डी लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपला पराभव केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसने राज्यसभेवर घेऊन आपल्याला मंत्रिपद द्यावे, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केली. राज्यात राज ठाकरे यांची ताकद असल्याचे स्पष्ट झाले आहे असे सांगून राज ठाकरे यांनी विधानसभेच्या सर्व जागा लढवाव्यात, असे आवाहनही आठवले यांनी केले.

उच्च आर्थिक विकासदरासाठी केंद्राची कर्ज घेण्याचीही तयारी -प्रणव मुखर्जी
नवी दिल्ली, २७ मे/खास प्रतिनिधी

जागतिक मंदीमुळे अर्थव्यवस्थेपुढे उभी ठाकलेली आव्हाने बघता रोजगारनिर्मितीची क्षमता असलेल्या उच्च आर्थिक विकासदराला चालना देण्यावाचून पर्याय नसून त्यासाठी केंद्र सरकारची कर्ज घेण्याचीही तयारी आहे, अशी स्पष्ट भूमिका आज अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मांडली. नॉर्थ ब्लॉकमध्ये २५ वर्षांनंतर परतून अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते प्रथमच पत्रकार परिषदेत बोलत होते.

निवडणुकीपर्यंत विजेचा तुटवडा राहणार केवळ दीड हजार मेगावॅटचा
मुंबई, २७ मे/प्रतिनिधी

राज्यातील विजेचा तुटवडा ५५०० मेगावॅटवरून आता ३००० मेगाव्ॉटवर आला असून येत्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे निवडणुकीपूर्वी तो केवळ दीड ते दोन हजार मेगावॅट इतकाच राहील, असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.

काँग्रेसची यंग इलेव्हन
अगाथा संगमा बाराव्या खेळाडू
नवी दिल्ली, २७ मे/खास प्रतिनिधी
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अपेक्षेप्रमाणे अनेक तरुण चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, सचिन पायलट, भरतसिंह सोळंकी, तुषारभाई चौधरी, अरुण यादव, प्रतीक पाटील, ए. साई प्रताप, आर.पी.एन. सिंह, प्रदीप जैन, व्हिन्सेंट पाला या अकरा राज्यमंत्र्यांसह सर्वात तरुण अगाथा संगमांना बुजुर्ग कॅबिनेट मंत्र्यांचे तरुण राज्यमंत्री सहकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

असं आहे केंद्रीय मंत्रिमंडळ
कॅबिनेट मंत्री
वीरभद्र सिंग
विलासराव देशमुख
डॉ. फारुख अब्दुल्ला
दयानिधी मारन
ए. राजा

कॅबिनेटमध्ये दलित नेत्यांना झुकते माप
नवी दिल्ली, २७ मे / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांपूर्वी देशभरात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी ‘दलित की बेटी’ म्हणून पंतप्रधानपद पटकाविण्यासाठी केलेल्या वातावरण निर्मितीला मतदारांनी नाकारले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना काँग्रेसनेही मायावती इफेक्ट संपुष्टात आणण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. २२ मे रोजी मंत्रिमंडळात सुशीलकुमार शिंदे आणि मीराकुमार या दलित नेत्यांच्या कॅबिनेटमधील समावेशापाठोपाठ उद्याच्या विस्तारात मल्लिकार्जुन खरगे, कुमारी सेलजा, मुकुल वासनिक हेही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात द्रमुकचे ए. राजा यांच्यासह सहा दलित मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवाय कृष्णा तीरथ यांनाही राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. पानाबाका लक्ष्मी, मुनिअप्पा या दलित खासदारांचाही राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.