Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मांजरा कारखान्यातर्फे विविध कार्यक्रम उत्साहात
लातूर, २७ मे/वार्ताहर

 

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरा साखर कारखान्यात विविध कार्यक्रम उत्साहात झाले.
मांजरा कारखान्यात आयोजित रक्तदान शिबिरात कार्यकारी संचालक अशोकराव गिरवलकर यांच्यासह संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठय़ा संख्येने रक्तदान केले. वाढदिवसाचे औचित्य साधून मांजरा कारखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध क्रीडा स्पर्धामधील विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष विजयमूर्ती शेटे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोकराव गिरवलकर, अभियंता सुनील देशमुख, शेतकरी अधिकारी राजेंद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी विजय काळे आदी उपस्थित होते.
बाजार समितीतही रक्तदान शिबिर
देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर व मार्केट यार्डातील विविध संघटनांनी दगडोजीराव देशमुख सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकदास झंवर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ललित शहा, पांडुरंग मुंदडा, बापू हजारे, तुळशीराम गंभिरे, भानुदास कांबळे उपस्थित होते. या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात पारस चापसी यांनी एकशे तेराव्या वेळी रक्तदान केले. या वेळी बाजार समितीचे सभापती लालासाहेब देशमुख, उपसभापती संभाजी वायाळ, संचालक उपस्थित होते.