Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

आय.आय.टी. परीक्षेत गुरुकुलचे ३२ विद्यार्थी चमकले
औरंगाबाद, २७ मे/प्रतिनिधी

 

आय.आय.टी.-जेईई प्रवेश परीक्षेत गुरूकुल क्लासेसच्या ३२ विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. गुरूकुलच्या पहिल्याच बॅचने केलेल्या कामगिरीबाबत सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
अदालत रोडवर शीतल शोरूममागे वर्षभरापासून कार्यरत असलेल्या गुरूकुल क्लासेसच्या ८५ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांनी आय.आय.टी.-जेईई प्रवेश परीक्षेत यश मिळविले आहे. सोमवारी आय.आय.टी.-जेईई प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर झाले. अभिषेक मुळे, सुशांत महाजन, दिग्विजय खिल्लारे, अनिरुद्ध महाजन, तेजस शहा, रोहन कुलकर्णी, शुभंकर कातकर, श्रीपाद वाघमारे, मिहीर कारखाने अशा ३२ विद्यार्थ्यांनी गुरूकुलचे नाव उंचावले, असे संचालक निर्मकुमार बिस्वाल यांनी सांगितले.
अचूक मार्गदर्शन, नियोजनबद्ध तयारी व प्रशिक्षकांची सहकारी वृत्ती हेच गुरूकुलच्या यशाचे गमक आहे. आय.आय.टी.-जेईई व अभियांत्रिकीच्या इतर प्रवेश परीक्षांची तयारी करणारी शहरातील अग्रगण्य संस्था असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या जोडीला समृद्ध ग्रंथसंपदा आणि शैक्षणिक साहित्य इंजिनीयर्स घडविण्यास परिपूर्ण आहेत, असेही श्री. बिस्वाल यांनी सांगितले. यावेळी गुरूकुलचे उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.