Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘नैसर्गिक आपत्तीवर उपाय करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडे तयार करावेत’
नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
नांदेड, २७ मे/वार्ताहर

 

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थितीवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी विवि-ध खातेप्रमुखांनी तालुकानिहाय बैठक घेऊन नियोजनबद्ध आराखडे तयार करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी केली.बचत भवन जिल्हाधिकारी कार्या-लयात नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयो-जन करण्यात आले होते. त्यात त्यांनी ही सूचना केल्या.
डॉ. परदेशी म्हणाले की, या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी कोणीही कामात टाळाटाळ करू नये. अन्यथा गुन्हा होऊ शकतो. त्यासाठी संबंधित गावातील शिक्षक, अंगणवाडी कार्य-कर्ता, पोलीस पाटील, विविध संघटनां-ना विश्वासात घेऊन बैठका घ्याव्यात. सन २००६मध्ये आलेल्या पुरामध्ये वित्तहानी झाली. त्यावेळी जिल्ह्य़ात जवळपास २०० गावांना पुराचा तडाखा बसला. वेळीच उपाययोजना केली; त्यामुळे अनेक संकटाला तोंड देऊन अनेकांचे प्राण वाचविले गेले. या वेळी पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. यावर्षी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास सर्व यंत्रणेने सज्ज रहावे. या वेळी संबंधित यंत्रणेला नैसर्गिक आपत्तीची माहिती तसेच प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड आदींनी दक्ष राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी २००६च्या पूर परिस्थितीत कशा सोयी उपलब्ध करून दिल्या, महापलिकेने कोणत्या उपाय-योजना केल्या, यंत्रणा कशीस सज्ज होती याची माहिती चित्रफितीद्वारे दिली. या वेळी श्रावण हर्डीकर, श्री. वायचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी आरगुंडे उपस्थित होते.