Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

नाबार्ड बँकेचे सहायक प्रबंधक किणी यांचा गौरव
लातूर, २७ मे/वार्ताहर

 

जिल्ह्य़ातील विविध स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नाबार्ड बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक व्ही. जी. किणी यांचा नुकताच गुणगौरव करण्यात आला.
महाप्रबंधक किणी यांची मुंबई येथील नाबार्डच्या मुख्य कार्यालयात बदली झाल्याने लातूर येथील नाबार्ड कार्यालयात निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी त्यांचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर लातूर जिल्ह्य़ाचे नाबार्ड बँकेचे नूतन जिल्हा विकास अधिकारी मनोज रायवाड, उस्मानाबाद जिल्ह्य़ाचे नूतन जिल्हा विकास अधिकारी सी. डी. देशपांडे आदी उपस्थित होते.
विजय किणी सत्कारप्रसंगी म्हणाले, लातूरला सर्व स्वयंसेवी संस्थेतील व्यक्तींनी मला सहकार्य केले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्य़ात स्वयंसहाय्यता बचत गट आणि कृषी विकासाचे मोठे कार्य उभे राहिले आहे.
मनोज रायवाड म्हणाले, यापूर्वी लातूर जिल्ह्य़ाचे नाबार्ड बँकेचे कार्य १०० टक्क्य़ांपेक्षा अधिक असल्याने मला केवळ या कामाचा पाठपुरावा करावा लागणार आहे. सर्वाच्या सहकार्यानेच आपण सामाजिक चळवळ मोठय़ा प्रमाणात उभी करू शकतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजय गवई यांनी केले तर आभार शिवाजी माने यांनी मानले.