Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाचा प्रस्ताव कॅपिटेशन फी, देणगीला फाटा
प्रतिनिधी

 

आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनिअर व्हावे अशी अनेक पालकांची इच्छा असते. मात्र सीईटी झाल्यावर चांगले मार्क नसतील तर, डोनेशनच्या, कॅपिटेशन फीच्या नावाखाली लाखो रूपये पालकांना भरावे लागतात. भारतातील या महागडय़ा वैद्यकीय शिक्षणाला आता रशियाने चांगला व दर्जेदार पर्याय उपलब्ध केला आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षण घ्यायचे तर, विद्यापीठ कोणते असेल, आपल्या पाल्याची परदेशात काय सोय होणार, तेथील दर्जा कसा असेल अशा हजारो शंका पालकांच्या मनात असतात. रशियातील स्मोल नेक्स स्टेट मेडिकल अ‍ॅकॅडमीने भारतीय विद्यार्थ्यांची ही अडचण सोडवली आहे.
दरवर्षी तीन हजार डॉलर्स (अंदाजे एक लाख ३५ हजार रूपये) फी असणारे पाच वर्षे आठ महिने एवढय़ा कालावधीचे रशियन वैद्यकीय शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांना २००२ पासून उपलब्ध झाले आहे. रशियातील स्मोल नेक्स स्टेट मेडिकल अ‍ॅकॅडमीचा रशियन सरकारचा मान्यता असलेल्या एमडी (भारतातील एमबीबीएस) अभ्यासक्रमाला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे. या अ‍ॅकॅडमीत प्रवेशासाठी सीईटीची गरज नाही. सध्या या विद्यापीठात ८२० भारतीय मुले शिकत असून त्यापैकी ३०० मुले महाराष्ट्रातील आहेत. भारताच्या विवीध प्रांतातून मुली देखील या विद्यापीठीत शिक्षण घेत आहेत. मुले व मुलींसाठी स्वतंत्र होस्टेल असून शुध्द शाकाहारी मेसची सोय आहे. भारतीय विद्यार्थी मोठय़ा संख्येने येथे असून अनेक भारतीय सण विद्यार्थी उत्साहात साजरा करतात. तीन पेपरच्या या परिक्षेत किमान ५० टक्के दुण मिळाल्यास उत्तीर्ण मानले जाते. त्याची तयारी देखील रशियातत करून घेतली जाते. राजस्थानमधील डॉ. आलोक एरॉन यांनी रशियातून टीव्हीईआर विश्वविद्यालयातून १९९६ मध्ये वैद्यकीय पदवी घेतली. भारतातील मुलांनाही रशियातील वैद्यकीय शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्यानी प्रयत्न सुरू केले. भारतात किमान तीन ते चार लाख रूपये प्रती वर्ष वैद्यकीय शिक्षणासाठी खर्च येतो. कॅपिटेशन फी, डोनेशन याचा खर्च वेगळाच असतो. भारताच्या विविध भागात असलेले पालक नवीन मुलांना प्रवेशासाठी मार्गदर्शन करतात. डॉ. आलोक एरॉन हे सध्या भारतात आले असून २९ मे रोजी औरंगाबादला रविराज हॉटेलमध्ये, ३० मे रोजी ठाण्याला टिएमए हॉलमध्ये, ३१ मे रोजी अंधेरी येथील कुमारिया प्रेसीडेन्सी, एक जून रोजी नागपूरला सायंटिफिक हॉल येथे, २ जून रोजी पुणे येथे स्वप्नशिल्प हॉलमध्ये स्मोल नेक्स स्टेट मेडिकल अ‍ॅकॅडमी वैद्यकीय प्रवेशाबाबत माहिती देमाऱ्या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या विद्यापीठातील शैक्षणिक सुविधांच्या माहितीसाठी www.sgma.info/foreign या वेबसाईटवर संपूर्ण माहिती मिळू शकेल. पालकांतर्फे पद्मजा कुळकर्णी यांच्याशी प्रवेश व सेमिनारबाबत ९८२१८ ६२९९२ वर संपर्क साधता येईल.