Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

आरोग्य
‘प्लेटलेटफेरेसिस’- काळाची गरज

१४ वर्षांचा नववी इयत्तेत शिकणाऱ्या अमोलला सारखा थकवा जाणवतो, म्हणून त्याच्या वैद्यकीय तपासण्या केल्या असता ‘अप्लास्टिक अ‍ॅनिमिया’ असे त्याचे निदान केले गेले. त्याच्यात हिमोग्लोबिनबरोबर ‘प्लेटलेट’चीही कमतरता असल्याने त्याला रक्ताबरोबर प्लेटलेटही वारंवार बाहेरून दिल्या जाव्या लागणार, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. त्यासाठी रक्तपेढीत जाऊन ‘अफेरेसिस’ करून घ्या, असा सल्ला त्याच्या नातेवाईकांना देण्यात आला.

सांस्कृतिक कट्टा
अत्तराचा सुगंध

पत्रकारांचे लिखाण हा एक स्वतंत्र विषय आहे. अनेक पत्रकारांची लेखणी, बातमी आणि बातमीपत्रांपर्यंतच मर्यादित राहते. विशेषत: विविध वृत्तपत्रांचे जे दिल्ली प्रतिनिधी असतात ते राजकीय घडामोडींपुरतेच स्वत:चे कार्यक्षेत्र मर्यादित ठेवतात. अशोक जैन यांनी दिल्लीतून वार्तापत्रे लिहिताना या परंपरेला छेद दिला. राजकारणापलीकडील सांस्कृतिक राजधानीचे कधी स्तिमित करणारे तर कधी अंतर्मूख करणारे दर्शन त्यांनी आपल्या लेखणीने घडविले.

घडामोडी
मराठवाडा
जिल्हा बँकांपेक्षा सावकारच बरा की!

पेरणीपूर्व मशागत झाली. राने तयार आहेत. आता मान्सूनची वाट पाहताना खतासाठी पुन्हा ‘खदखद’ तर होणार नाही ना? खुळखुळा झालेल्या मराठवाडय़ातील सहा जिल्हा बँकांमधून खरिपासाठी, किती कर्ज मिळणार? बदललेल्या पीकरचनेत सोयाबीनचे बियाणे पुरेल का? उत्तरे देणारी यंत्रणा खरीप हंगामाच्या तयारीसाठी कागदी घोडे नाचवत आहे. पाणीटंचाईतून न सावरलेले मराठवाडय़ातील अधिकारी खरीप हंगाम आढाव्याच्या तयारीत गुंतल्याचे दाखवत आहेत. नेते निवडणुकीतील जय-पराजयाच्या आत्मचिंतनात मग्न आहेत. शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे तो पैशांचा!