Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

पतीच्या खूनप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
कोपरगाव, २९ मे/वार्ताहर

जमिनीच्या वादातून तालुक्यातील अंचलगाव येथे अंगावर अ‍ॅसिड टाकून पतीस जिवंत ठार

 

मारल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक जगदीश पाटील यांनी सांगितले की, या घटनेतील मृत रामदास नामदेव जाधव (वय ६५) यांची बहीण जनाबाई दगडू धाकतोडे (रा. दहिवडी, ता. सिन्नर) हिने न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. भाऊ रामदास जाधव यांना त्यांची पत्नी ताराबाई व दादासाहेब व शंकर या दोन मुलांनी अंचलगाव शिवारातील शेतजमीन नावावर करून द्यावी म्हणून सतत तगादा लावला. त्यास रामदास यांनी नकार दिला, म्हणून तिघांनी त्यांना घराबाहेर काढून १ एप्रिल रोजी अंगावर अ‍ॅसिड टाकून जिवंत मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासासाठी पोलीस निरीक्षक पाटील अंचलगाव येथे रवाना झाले, असे पोलीस हवालदार पठाडे यांनी सांगितले.