Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

राहाता, संगमनेरमध्ये परिवर्तन युवा मंच स्थापन
राहाता, २९ मे/वार्ताहर

राहाता व संगमनेर तालुक्यांतील सामाजिक प्रश्नांवर जागृती करण्यासाठी व तरुणांना संघटित करून

 

त्यांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी परिवर्तन युवा मंचची स्थापना करण्यात आल्याची माहिती कैलास घोरपडे यांनी दिली.
राहाता व संगमनेर तालुक्यांतील जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडेच्या कालव्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, कालव्याची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, तसेच गोदावरी कालव्यांच्या रुंदीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, राहाता व संगमनेर तालुक्यांतील तरुणांचे प्रश्न, ग्रामीण भागातील रस्ते, कामगार आदी प्रश्नांवर समाजात जनजागृती करण्याचे काम परिवर्तन युवा मंच करणार आहेत.
परिवर्तन युवा मंचची राहाता व संगमनेर तालुक्यांतील कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - अध्यक्ष कैलास घोरपडे, उपाध्यक्ष रवींद्र चौधरी, सचिव राजेंद्र आग्रे, सल्लागार संदीप निर्मळ, नारायण घोरपडे, सदस्य सोपान सातव, कैलास लावरे, रखमा तांबे, संदीप धनवटे, भाऊसाहेब सांबारे, जालिंदर कोल्हे, सतीश मते, गोरक्षनाथ गमे, उत्तम पारखे, बाबासाहेब घोरपडे.