Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘विनापरवाना वाहतूक बंद करा’
राजूर, २९ मे/वार्ताहर

विनापरवाना अ‍ॅपेरिक्षा, मिनिडोअर व खासगी मारुती व्हॅन बंद करण्यात याव्यात, अशी मागणी

 

नेवासे तालुका टॅक्सी व अ‍ॅटो रिक्षा संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत संघटनेने निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. औरंगाबाद खंडपीठाने खासगी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले असतानाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना प्रवासी वाहतूक सुरू आहे. यामुळे परवानाधारक वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विनापरवाना वाहतूक करणारे परवानाधारक चालक-मालकांना शिवीगाळ व वेळप्रसंगी मारहाणही करतात. याकडे वाहतूक पोलीसही लक्ष देत नाहीत. या संदर्भात दि. १ जून रोजी परवानाधारक चालक आपल्या वाहनांसह पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
विनापरवाना वाहतूक बंद होईपर्यंत परवानाधारक गाडय़ांवर केसेस दाखल केल्यास त्याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे संघटनेने दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष नामदेव घोरपडे, महावीर शिंगी, विठ्ठलराव दगडे, संदीप गाडेकर, भाऊसाहेब थिटे व अन्य सदस्यांच्या निवेदनावर सह्य़ा आहेत.