Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

शहावलीबाबांच्या उरुसाला नेवाशात कुराण पठणाने प्रारंभ
नेवासे, २९ मे/वार्ताहर

येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत शहा कामिल शहावलीबाबांच्या उरुसास

 

आजपासून कुराण पठणाने उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांसह कव्वालीचा मुकाबला होणार आहे.
उद्या (शनिवारी) संदल आहे. यानिमित्त दुपारी ४ वाजता चादर मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी (दि. ३१) उरुसाचा मुख्य दिवस असून, दुपारी ४ ते ६ या वेळेत स्थानिक संघटनांच्या वतीने चादर मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता शोभेचे दारूकाम व आतषबाजी होणार आहे. रात्री मुंबई येथील रुक्साना बानो रंगिली व आयूब निजामी यांच्यात कव्वालीचा मुकाबला होणार आहे.
उरुसानिमित्त दग्र्यावर रोषणाई करण्यात आली आहे. हिंदू-मुस्लिम भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उरुस समितीचे अध्यक्ष महंमद शेख, सदस्य सादिक शिलेदार, इम्रान दारूवाले, अंजुम पटेल, मोमीन पटेल, फारूक जहागीरदार, पाशा काझी, भाऊसाहेब वाघ यांनी केले आहे.
हजरत शहा कामिल शहावलीबाबांचा उरुस हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. हिंदू समाजाच्या वतीने बाबांना मलिद्याचा नैवेद्य अर्पण केला जातो, तर काहीजण शेरणी वाटतात.