Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘विजयाची मस्ती चढल्याने खैरेंकडून साधूंची टिंगल’
नगर, २९ मे/प्रतिनिधी

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांना विजयाची मस्ती चढली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदू

 

साधू-संतांची टिंगल टवाळी केली जात आहे. हा प्रकार निषेधार्ह असून, त्यांनी शांतिगिरीमहाराजांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेने दिला आहे.
छावाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सांगळे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खासदार खैरे यांच्या विरोधात शांतिगिरीमहाराज लोकसभा निवडणुकीस उभे होते. त्याचा राग धरून खैरे त्यांच्यावर बेताल आरोप करीत आहेत. खैरेंची लायकी महाराजांसमोर शून्य आहे.
खासदार होणे व साधू-संत होणे यात फरक आहे. भिकारीही
खासदार होऊ शकतो. परंतु साधू होण्यासाठी संपूर्ण जीवन परमार्थात व्यतित करावे लागते, हे खैरे यांनी लक्षात घ्यावे. खैरे यांनी शांतिगिरीमहाराजांबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे, असे पत्रकात म्हटले आहे.