Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

टाकळी खातगावजवळ पुलावरून मालमोटार कोसळून चालक ठार
नगर, २९ मे/प्रतिनिधी

मालमोटार पुलावरून खाली कोसळून चालक ठार झाला. आज पहाटे हा अपघात नगर-कल्याण

 

रस्त्यावर टाकळी खातगाव शिवारातील सीना नदी पुलावर झाला.
सतीश बाबासाहेब खेडकर (२५ वर्षे, रा. भालगाव, ता. पाथर्डी) असे मृताचे नाव आहे. हरिदास भीमराज भाबड (१९ वर्षे, रा. आगसखांड, ता. पाथर्डी) हा चालकाचा मदतनिस जखमी झाला. त्यानेच फिर्याद दिली.
उल्हासनगरहून निघालेली ही मालमोटार औरंगाबादला जात होती. टाकळी खातगाव येथील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालमोटार सुमारे २० फूट खोल नदीत कोसळली. तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार क्षेत्रे तरीत आहेत.