Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

जनसेवेसाठी कटिबद्ध - वाकचौरे
राहाता, २९ मे/वार्ताहर

आपला माणूस म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, असे प्रतिपादन शिर्डी

 

लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नूतन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
राहाता शहर शिवसेनेच्या वतीने खासदार वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी खासदार वाकचौरे व सरस्वती वाकचौरे यांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. के. वाय. गाडेकर, नगरसेवक अनिल टाक, राहाता तालुका शिवसेनाप्रमुख नाना बावके, किशोर दंडवते उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मला आपण आपला माणूस म्हणून निवडून दिले. आपला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी मिळालेल्या संधीच्या माध्यमातून समाजाची सेवा करीन. खासदार म्हणून मिळणारे मानधन मतदारसंघातील मंदिरासाठी देणार आहे. पहिली वचनपूर्ती सरला बेट येथील महंत नारायणमगिरीमहाराजांच्या समाधीस देऊन करणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. खासदार वाकचौरे यांच्या विवाहास ३१ वर्ष पूर्ण झाल्याने समारंभाचे औचित्य साधून यावेळी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
उप जिल्हाप्रमुख राजेंद्र पठारे, नगरसेवक टाक, डॉ. गाडेकर, बावके, शेखर बोऱ्हाडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास रोहीत वाकचौरे, विठ्ठल पवार, नवनाथ हेकरे, सतीश गुंजाळ, अनिल बांगरे, नितीन पुंड, अन्वर शेख, अमोल वहाडणे, मंजीराम शेळके, गोरख वाकचौरे उपस्थित होते.