Leading International Marathi News Daily
रविवार, २४ मे २००९

समन्वयाचा प्रत्यय येईल
राशीस्थानी मंगळ, अकरावा गुरू याचाच अर्थ व्यवहारामध्ये प्रयत्न यशाचा अचूक समन्वय. रविवारी अमावस्या संपताच त्याचा प्रत्यय येऊ लागेल. दशमातील राहू प्रतिष्ठा मजबूत करणार आहे. शनिवारच्या चंद्र-मंगळ नवपंचम योगापर्यंत प्रगतीचे चित्र आकर्षक होत राहील. त्यात व्यापारातून मिळणारा पैसा, समाजात मिळणारी प्रतिष्ठा, रंगभूमीवरील कला, आविष्कार, साहित्यातले विषय यांचा समावेश राहील. गुरू-नेपच्यून युती अध्यात्मांत नव्या उंचीवर घेऊन जाणारी ठरेल.
दिनांक- २४ ते २७ शुभकाळ
महिलांना- सन्मानाचा आनंद मिळेल.

आगेकूच सुरू राहील
राशीस्थानी सूर्य, भाग्यात राहू, दशमात गुरू मीन शुक्र अशाच ग्रहकाळात दैव देत राहते, परंतु शनी, मंगळ अनिष्ठ असले तर त्यावर कर्माने हात मारू नये यासाठी सतर्क राहणे आवश्यक असते. वृषभ व्यक्तींची अनेक क्षेत्रांतील शक्ती वाढेल. त्यातून संपर्क वाढतील. प्राप्ती वाढेल. गुरू-नेपच्यून युती गुरूपुष्य योग अविस्मरणीय घटनांचे आधारच ठरतील. मंगलकार्य ठरावे. धर्मकार्य चमत्काराचे ठरतील.
दिनांक- २५ ते २९ अनुकूल काळ.
महिलांना- अपेक्षित सफलता मिळवता येईल.

गणितं अचूक सुटतील
भाग्यात गुरू, दशमात शुक्र, लाभांत मंगळ पराक्रमी शनी असल्यास व्यवहाराची गणितं अचूक सुटतात आणि प्रगतीचा आलेख उंचावत राहतो. व्ययस्थानी रवी असल्याने थोडाफार खर्च वाढेल. थोडेफार दडपण राहील, परंतु सुरू असलेल्या प्रवासात व्यत्यय येणार नाही. गुरू-नेपच्यून युती शोधकार्यात चमत्काराची ठरते. गुरुपुष्ययोग व्यवहारात उत्साह निर्माण करील. प्रिय आप्तांच्या भेटी होतील. स्पर्धा कटाक्षाने टाळा.
दिनांक- २६ ते ३० शुभकाळ.
महिलांना- यश आणि शुभवार्ता प्रयत्नात उत्साह आणतील.

प्रतिष्ठा राखली जाईल
साडेसाती, अष्टमांत गुरू यांच्यामुळे जमाखर्च तयार करणे सोपे ठरणारच नाहीत. परंतु सूर्य, मंगळ, राहू, मीन, शुक्र यांच्यातील प्रतिसाद रकमांची बरोबरी करण्यास शनिवारच्या चंद्र-मंगळ नवपंचम योगापर्यंत सहकार्य करीत राहणार असल्याने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकणार नाही. गुरू-नेपच्यून युती परमेश्वरी चिंतनातून आनंद देणारी आहे. अपरिचित व्यक्तींपासून सावध राहा. प्रकृती आणि परिवार यांच्या तक्रारींवर दुर्लक्ष नको. व्यापारी प्रभाव वाढतच राहील.
दिनांक- २४, २५, २८, २९ शुभकाळ
महिलांना- प्रयत्न करा, यश मिळेल. शुभकार्ये ठरतील.

यश मिळेल
साडेसाती, अनिष्ठ राहू, केतू यांच्या परिणामांनी प्रगतीमध्ये छोटय़ा- मोठय़ा अडचणी येत राहतील. परंतु गुरूची कृपा, रवी, मंगळाचे सहकार्य, अनुकूल बुधातून होणारा युक्ती पुरवठा, प्रतिष्ठा सांभाळणारे यश सिंह व्यक्तींना मिळवून देणार आहे. शनिवारच्या चंद्र-मंगळ नवपंचम योगापर्यंत त्याचा प्रत्यय येत राहील. श्रीमारुतीची उपासना, आराधना गुरू-नेपच्यून युतीमुळे समस्या सोडवून घेण्यास उपयुक्त ठरेल. अचानक लाभ, भेटी, चर्चा उत्साह निर्माण करतील. मंगलकार्य ठरेल. नोकरीचा प्रश्न सुटेल.
दिनांक- २४ ते २७ शुभकाळ
महिलांना- प्रयत्न करा. प्रगती होईल, प्रतिष्ठा वाढेल.

सतर्क राहा, पुढे चला!
साडेसाती, गुरूची नाराजी, मंगळ अष्टमात अशा ग्रहकाळात आश्वासन, नवीन परिचय, आर्थिक करार महत्त्वाची खरेदी- विक्री आणि प्रकृतीच्या तक्रारी यासंबंधात सतत सतर्क राहावं लागणार आहे. अगदी रविवारच्या अमावस्यापासूनच याबाबतीत सावधता बाळगा. मीन, शुक्र, भाग्यांत सूर्य, पंचमात राहू यांची साथ मिळणार असल्याने उत्साह, थोरांचे सहकार्य युक्तीप्रयोग यामधून इभ्रतीला मजबूत संरक्षणात ठेवता येईल.
दिनांक- २४ ते २८ या शुभकाळात बाजी मारून पुढे सरकता येईल.
महिलांना- बुद्धी, शक्तीचे हिशेब सांभाळा, यश मिळेल.

समस्या समोर येतील
चतुर्थात राहू, अष्टमात सूर्य, षष्ठात शुक्र यांच्यामधून छोटय़ा-मोठय़ा समस्या समोर येत राहतील; परंतु गुरू, शनी, मंगळ याचं सहकार्य मिळणार असल्याने शनिवारच्या चंद्र, मंगळ नवपंचम योगाच्या आसपास अचानक संधी सापडतील आणि समस्यांवर विजय मिळवता येईल. चुका, स्पर्धा, साहस, प्रलोभनं यापासून मात्र दूर राहणं आवश्यक राहील. गुरू-नेपच्यून युती देवधर्मातील पुण्य समाजात प्रतिमा चकचकीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. नवीन उपक्रम हाती घेतले जातील.
दिनांक : २६ ते ३० शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नांनी प्रगती साधता येईल.

कृती यशस्वी ठरतील
दशमांत शनी, सप्तमांत रवी, मीन, शुक्र, पराक्रमी राहू यांच्यातील प्रतिक्रिया वृश्चिक व्यक्तींना पुढे घेऊन जाणार आहेत. त्यात व्यत्यय येऊ नये यासाठी षष्ठातील मंगळ शत्रूंची नाकेबंदी करील. व्यापार, राजकारण, कला, साहित्य, शिक्षण यामध्ये झटपट निर्णय घेऊन केलेल्या कृतींना शनिवारच्या चंद्र-मंगळ नवपंचम योगापर्यंत कर्तृत्व उजळून काढणारं यश मिळणार आहे. प्रपंच, आप्त, मिळकत या संबंधात चतुर्थात गुरू असेपर्यंत अपेक्षित तोडगा निघणं मात्र अवघड दिसते.
दिनांक : २४, २५, २८, २९ शुभकाळ.
महिलांना : महत्त्वाची प्रकरणं मार्गी लावता येतील.

सफलतेने रंग बदलेल
पराक्रमी गुरू पंचमात, मंगळ भाग्यात, शनी यांना शिकस्तीच्या प्रयत्नाची साथ दिलीत तर कार्यप्रांताचा रागरंग बदलवून टाकणारी सफलता शनिवारच्या चंद्र- मंगळ नवपंचम योगापर्यंत आपणास मिळवता येईल. बडी बडी मंडळी सहवासात येतील. नवे नवे प्रस्ताव येतील. याचा भविष्यासाठी उपयोग करून घ्यायला हवा. समाजात सन्मान मिळतील. संशोधनात यश मिळेल. व्यापारी केंद्रावर गर्दी वाढेल,प्रवास होतील, भारदस्त खरेदी व्हावी, नजीकचा काळ महत्त्वाच्या घडामोडींचा आहे.
दिनांक : २४, २५, ३० शुभकाळ.
महिलांना : समीकरण कल्पकतेने जुळवता येतील. त्यातून प्रभाव वाढेल.

यश मिळेल
राशीस्थानी राहू, मीन, शुक्र पंचमात, सूर्य आणि गुरूची कृपा याच ग्रहांमधून अंदाज अचूक ठरतात, प्रयत्नात उत्साह प्रकटतो आणि यश निश्चित होते. व्यापार, राजकारण, कला, साहित्यात असणाऱ्या मकर व्यक्तींना याचा प्रत्यय येईल. अष्टमात शनी, चतुर्थात मंगळ असल्याने प्रपंच आणि आरोग्य मात्र त्रस्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संधी आणि सफलता यावर दुर्लक्ष होऊ देऊ नका. प्रवास कराल, थोरांचे सहकार्य मिळवाल, गुरू-नेपच्यून युती परमेश्वरी चिंतनातून आनंद देईल.
दिनांक : २४, २५, २८, २९ शुभकाळ.
महिलांना : विचारांच्या वेगातून होणारी कृती नेत्रदीपक यशाची ठरेल.

अधिकार, शब्द जपून वापरा
राशीस्थानी गुरू, पराक्रमी मंगळ, सप्तमात शनी, मीन, शुक्र, कुंभ व्यक्तींचा प्रभाव प्रस्थापित करणारी ग्रहस्थिती शनिवारच्या चंद्र-मंगळ नवपंचम योगापर्यंत व्यापार, प्रपंच, अर्थप्राप्ती, सामाजिक सन्मान, कला, आविष्कार यांमध्ये सहकार्य करीत राहणार आहे. चतुर्थात रवी, बुध, व्ययस्थानी राहू असेपर्यंत अधिकार, शब्दांचा उपयोग मात्र जपून करायला हवा. बुद्धी, शक्तीचे हिशेब सांभाळा, प्रवास होतील. शुभवार्ता समजतील, नवे परिचय होतील आणि परमार्थिक प्रसन्नता लाभेल.
दिनांक : २६, २७, ३० शुभकाळ.
महिलांना : कल्पना कृतीत येतील, संपर्क, दबदबा निर्माण कराल.

प्रकरणे मार्गी लागतील
शुक्र, सूर्य, बुध, राहू यांची अनुकूलता आणि गुरू, शनी यांची नाराजी अशा चक्रात सापडलेल्या मीन व्यक्तींनी संयम, शिस्त, सत्य यांच्या आधाराने उपक्रम सुरू ठेवले तर अनेक प्रकरणं मार्गी लावता येतील. दडपणं कमी होतील. वाद, स्पर्धा नियंत्रणात आणता येतील. व्यवहारात चुका करू नका. सावकारी, शासकीय विभागात सतर्क राहा. प्रकृतीची पथ्यं सांभाळा. गुरू-नेपच्यून युती प्रार्थनेमधील तपश्चर्या सत्कारणी लागल्याचा प्रत्यय येत असतो.
दिनांक : २४, २५, २८, २९ शुभकाळ.
महिलांना : विचलित होऊ नका, प्रयत्न करा, पुढे चला, यश मिळेल.