Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

विज्ञानमयी -

चंदा निंबकर
चंदा निंबकर ही एसएससी परीक्षेत महाराष्ट्रात तिसरी येऊनसुद्धा शास्त्रशाखेकडे न वळता वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. तिच्या वडिलांची िनबकर अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूट होती. तेथे ते सूर्यफूल, करडई, ज्वारी इ. पिकांमध्ये वाढ कशी करता येईल यावर संशोधन करीत. वाणिज्यशाखा निवडतानाही चंदाला केवळ हिशेबाच्या वह्यांत डोकं खुपसून राहायचं नव्हतं. आपलं संख्याशास्त्रचं ज्ञान व वडिलांचं संशोधन या दोहोंची सांगड घालण्यासाठी तिने एडिंबरो येथील पशुसंवर्धन विद्यालयात पुढील शिक्षण घेण्याचं ठरवलं. त्यात ती रमली. तेथे तिला पीएचडी करण्याची संधीही मिळाली होती; पण ती नाकारून १९९० मध्ये ती ‘नारी’ या संस्थेत दाखल झाली. तेथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या पशुसंवर्धन शाखेत काम करू लागली. ‘भरपूर मांस देणाऱ्या

 

निरोगी मेंढय़ांची पैदास’ हा त्यांचा विषय होता. त्यासाठी ऑस्ट्रेलियन शेती-संशोधन खात्याकडून भरीव आर्थिक मदत मिळत होती. २००२ साली चंदाला न्यू इंग्लंड, आर्मोडेल येथे जॉन ऑलराइट फेलोशिप मिळाली. मटणासाठी वापरल्या जाणाऱ्या मेंढय़ांच्या ‘दक्षिणी’ (दख्खनी) या खास जातीची जोपासना केली जाते. तिच्यामध्ये जुळ्यांचं (Twins) जनुक अंतर्भूत करण्याचा प्रयोग होता. पश्चिम बंगालच्या सुंदरबन भागात इंडियन गरोल जातीच्या मेंढय़ांमध्ये ‘बुसला बहुप्रसव जनुक’ आहे हे निंबकरांच्या संस्थेनेच सप्रमाण सिद्ध केलं व दख्खनी मेंढीत ते अंतर्भूत केलं. परिणामी, प्रत्येक मेंढीच्या वजनात (मांसात) चाळीस टक्के वाढ झाली. या कामामुळे भारतीय शासकीय संस्था, तसेच विश्वविद्यालये यांचे लक्ष गरोल मेंढी यांकडे वेधले.
निंबकरांनी आता ‘नारी सुवर्ण’ नावाची दख्खनी मेंढय़ाची जात विकसित केली आहे. ती प्रत्येक वेळी जुळ्यास जन्म देते. या मेंढय़ा त्यांनी स्थानिक शेतकरी, मेंढपाळ यांना तर दिल्याच; पण आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर अशा दूरदूरच्या प्रदेशांतही दिल्या आहेत. फलटणयेथील त्यांच्या संस्थेजवळील तीस लहान मेंढपाळांकडे त्या आहेत. त्याचा आर्थिक फायदा या मेंढपाळांना झाला आहे. आपल्या संशोधनाचा फायदा सामान्य माणसाला होत असल्याचे पाहून चंदाला सार्थक वाटतं.
‘आई-वडिल व पतीच्या सहकार्याशिवाय माझ्या हातून हे काम शक्य झालं नसतं’ असं चंदा कृतज्ञपणे सांगते. ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासासाठी देण्यात येणारं CSIR हे अ‍ॅवार्ड त्यांच्या संस्थेला मिळालं आहे.

रमा गोविंदराजन
खूप शिकायचं, गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी, हाताखाली काम करायला भरपूर माणसं.. असंच काहीसं रमानं लहानपणी ठरवलं होतं. आपण शास्त्रीय संशोधन करू असं मुळीच वाटलं नव्हतं. दिल्लीच्या आय. आय. टी.मधून ती बी. टेक झाली तेव्हा तिच्या केमिकल इंजिनीयरिंगच्या वर्गात ५४ विद्यार्थ्यांत ती एकटीच मुलगी होती. पण इथेच तिला खऱ्या अर्थाने शिकायला मिळालं. तिचे पीएच.डी.चे मार्गदर्शक प्रा. शेंदम नरसिंह यांनी तिला fluid mechanics अर्थात प्रवाही पदार्थाचे स्थिती-गती शास्त्र शिकवतानाच तिच्यात शास्त्रीय दृष्टिकोन रूजविला. प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक करणे, सखोल निरीक्षण करणे यावर भर दिला. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून तिने पीएचडी पूर्ण केली. नंतर लगेचच तिला मुंबईत हवी तशी मानाची नोकरी मिळाली. पण अधिक ज्ञान मिळविण्यासाठी तिने अमेरिकेत जाऊन पुढील शिक्षण घेतलं. तरीही औद्योगिक क्षेत्रात संशोधनाची संधी मिळाली नाहीच. याच सुमारास विवाह करून ती बंगलोरला आली. पण त्या काळात बंगलोरला आय. टी. क्षेत्र सोडल्यास इतर ठिकाणी फारसा वाव नव्हता. मग तिने देशाच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित अशा ‘एरोस्पेस’ व्यवसायात काम केले. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या काही वस्तू आपणाकडे बनविता येतील असे तिच्या लक्षात आले. परंतु तिथल्या विशिष्ट कार्यप्रणालीमुळे तिच ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. शेवटी ती फ्लुइड मेकॅनिक्समधील संशोधनाकडे वळली. एका राष्ट्रीय प्रयोगशाळेत तिने दहा वर्षे काम केलं. त्यानंतर नवीनच स्थापन झालेल्या ‘जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स सायंटिफिक रिसर्च’ (JNC) या संस्थेत ती दाखल झाली आणि तिला तिचं खरं क्षेत्र गवसलं. या संस्थेतून तिला एका संशोधकाला मनाजोगतं काम करण्याचं स्वातंत्र्य, सुविधा तसेच अन्य संशोधकांशी ज्ञान व कल्पना यांचे आदान-प्रदानच्या संधी तिला मिळाली. आज इथेच ती ‘सहाय्यक प्राध्यापक, इंजिनीयरिंग मेकॅनिक्स युनिट’ या पदावर आहे. तिच्या आजवरच्या संशोधनाची दखल घेत तिला शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार आणि उठफ फं ओरेशन अ‍ॅवॉर्ड ने सन्मानिक करण्यात आले आहे.
होतकरू तरुण संशोधकांना ती मेालाचा सल्ला देते, ‘तुमच्या मनात कोणते स्वप्न आहे ते ओळखा आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटा.’
वसुमती धुरू