Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

गर्भसंस्कार विशेषांक
स्त्रीची गर्भधारणा ही केवळ त्या स्त्रीलाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबालाच आनंदाची एक वेगळी अनुभूती देत असते. तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांना कसं सामोरं जावं, गर्भसंस्काराचं महत्त्व, गर्भाच्या शारीरिक, मानसिक वाढीसाठी कुठल्या गोष्टी करता येतील याची सविस्तर माहिती देणारा ‘गर्भसंस्कार आणि बालसंगोपन’ हा विशेषांक ‘आयडियल सांस्कृतिक’ ने प्रकाशित केला आहे. या अंकात गर्भसंस्कार ते बालसंगोपन यासंबंधीची शास्त्रोक्त माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेनंतर तसेच प्रसूतीपश्चात कोणता आहार घ्यावा, यासंबंधीचे मार्गदर्शन यात करण्यात आले आहे. यात डॉक्टरांच्या सूचनांसह आकर्षक पाककृतींचा समावेशही करण्यात आला आहे. त्याचसोबत गर्भपूर्व मानसिक तयारीचे महत्त्व डॉ. एम. डी. साने यांनी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. प्रसूतीक्रियेची माहिती देत त्या विषयक भीती घालविण्याचा प्रयत्न डॉ. सोनाली वनगे यांनी केला आहे. त्याचबरोबर नियमित व्यायामाचे महत्त्व विशद करून प्रसूती तंत्राची माहिती डॉ. विक्रम शहा यांनी दिली आहे.

 

बाळासाठी आईच्या दूधाचं असलेलं महत्त्व, बाळाचा आहार, बाळाचे आजार या माहितीसोबतच बाळगुटीविषयीचे समज-गैरसमज या अंकात स्पष्ट करून सांगितले आहेत. आयुर्वेद व होमियोपथीच्या दृष्टिकोनातून गर्भसंस्कार आणि बालसंगोपनावरील लेखांचाही या अंकात समावेश करण्यात आलेला आहे. पाळणाघराचा पर्याय निवडताना कोणती खबरदारी घ्यावी, याविषयीही माहिती देण्यात आली आहे.
लहान बाळांचा आहार, त्यांचे आजार, त्यावरील उपचार, त्यांच्यावरील संस्कार आणि शिक्षण अशा वेगवेगळ्या पैलूंचा आढावा घेणाऱ्या या विशेषांकाचे संपादन मंदार नेरूरकर यांनी केले आहे. ११९ पृष्ठांच्या या अंकाची किंमत ७० रुपये आहे.
- प्रतिनिधी