Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय वाढला पाहिजे - के. एल. प्रसाद
प्रतिनिधी

मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला कशामुळे झाला हे बाहेर येईलच. परंतु या अतिरेकी

 

हल्ल्यानंतर आम्ही काही गोष्टी तातडीने शिकलो पाहिजे. विशेष म्हणजे गुप्तचर यंत्रणांमधील समन्वयही वाढला पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) के. एल. प्रसाद यांनी अलीकडे केले.
या पत्रकार निखिल दिक्षित यांनी लिहिलेल्या ‘मुंबई अंडर सिझ’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसाद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वरिष्ठ पत्रकार अभय मोकाशी तसेच जयको प्रकाशनचे प्रमुख आर. एच. शर्मा हे यावेळी उपस्थित होते. प्रसाद पुढे म्हणाले की, २६/११ चा हल्ला ही दुर्दैवी घटना होती. मात्र आमच्या अधिकारी-शिपायांनी या हल्ल्याला समर्थपणे तोंड दिले. आमचे जिगरबाज पोलीस यामध्ये शहिद झाले. मात्र आता आम्हाला अधिक काळजीपूर्वक राहावे लागणार आहे. प्रत्येक बाबीत एक विशिष्ट धोरण असते. या हल्ल्याला सामोरे जाण्यास मुंबई पोलीस कुठेही कमी पडलेले नाही. गुप्तचर यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव हे जसे त्यामागे एक कारण आहे त्याप्रमाणे लोकांचा अनुत्साह तसेच प्रसारमाध्यमेही त्यास कारणीभूत आहेत, असा दावाही प्रसाद यांनी केला. प्रत्यक्ष घटनास्थळी राहून वार्तांकन केल्याचा अनुभव पुस्तक वाचताना येतो. कुठेही सनसनाटी न करता जे घडले व जे पाहिले ते पुस्तकात आढळते, असे मोकाशी यांनी सांगितले.