Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

एक रस्ता, आहा.. आहा..!
वार्ताहर / हरसूल

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामात खडीची कच उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून रस्त्यासाठी चक्क वाळूचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बलदापाडा ते टोकपाडा या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर हा प्रकार निदर्शनास आल्याने संतापलेल्या आदिवासी बांधवांनी या कामाची सखोल चौकशी करून रखडलेले काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष
महाराष्ट्रातील युती शासन पायउतार होऊन साडेनऊ वर्षे होत आले तरी काँग्रेस आघाडी सरकार तिजोरीतील खडखडाटीस अजूनही युती शासनाला जबाबदार धरत आहे. हा खणखणाट भरून काढण्यासाठी आघाडी शासनाने अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यापैकी एक निर्णय म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती. गेल्या नऊ वर्षांत महाराष्ट्र शासनाने अनेक विभागात हजारो पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदे भरण्यात आली.

माजी अध्यक्षांची छायाचित्रे झळकूनही जळगाव काँग्रेसमध्ये धुसफूस कायम
वार्ताहर / जळगाव
छायाचित्र प्रकरणी विद्यमान जिल्हाध्यक्षांना पायउतार व्हावेच लागेल, अशी स्व. प्रा. पाटील गटाची मागणी होती. त्याला प्रत्युत्तर देताना वाघ यांनीही मग समजावून घ्या, अन्यथा जशास तसे म्हणजे ठोशास ठोसा उत्तर देऊ असे सांगितले आणि वाद आणखीनच चिघळला. संपूर्ण जिल्ह्य़ात रसातळाला चाललेल्या काँग्रेस पक्षात सध्या जिल्हाध्यक्षांच्या छायाचित्रांवरून बंडाळी माजली आहे.

तंटामुक्ती अभियानातील न्यायनिवाडे
ग्रामीण भागाच्या विकासास आड येणारा घटक म्हणजे किरकोळ कारणांवरून होणारे तंटे. या तंटय़ांवर उपाययोजना केल्यास गावांचा विकास अधिक वेगाने व प्रभावीपणे होऊ शकतो. पोलिसांवरील ताणही कमी होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाची फलनिष्पत्ती योग्य प्रकारे होत असल्याची उदाहरणे दिसून येत असली तरी या अभियानातील सर्वच मुद्यांवर भर देण्याची गरज आहे. या सर्वाचा वेध लेखमालेतून अविनाश पाटील घेत आहेत. या मालेतील आठवा लेख.

‘स्वा. सावरकरांनी माणसे जोडण्याचे काम केले’
भगूर / वार्ताहर

जग जोडणे सोपे असते परंतु माणसे जोडणेही महत्वाचे असते, माणसे जोडण्याचे हे काम स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केल्याचे प्रतिपादन पुण्याचे गुलाबराव वळसेपाटील यांनी केले.

जलसेवा कर्मचाऱ्यांचा मोर्चा
मालेगाव / वार्ताहर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवेत असलेल्या जलसेवा कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी जलसेवा कर्मचारी महासंघातर्फे १ जून रोजी विधानभवनावर मोर्चा नेण्यात येणार असल्यची माहिती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष टी. जी. पिंजन यांनी दिली. जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याबद्दल पिंजन यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. जलसेवा कर्मचाऱ्यांवरील या अन्यायाला वाचा फोडण्याच्या दृष्टीने नुकतीच नाशिक येथे महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. भारतीय मजदूर संघाचे चिटणीस अनिल ढुमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

‘शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांकांची गरज नाही’
मालेगाव / वार्ताहर

शैक्षणिक प्रयोजनासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी करावयाचे प्रतिज्ञापत्र आणि इतर तत्सम कागदपत्रांसाठी कोणत्याही मुद्रांकांची आवश्यकता नसल्याने विद्यार्थी व पालकांनी मुद्रांकांशिवाय प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन प्रांताधिकारी अजय मोरे यांनी केले आहे. जातीचे, उत्पन्नाचे आदी स्वरुपातील दाखल्यांसाठी करावयाचे प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रांवर शासनाने मुद्रांकांची सूट दिली असताना २० किंवा ५० रुपयांच्या मुद्रांक पत्रावर प्रतिज्ञापत्र घेतले जाते. तसेच हे प्रतिज्ञापत्र तसेच प्रस्तावाच्या इतर कागदपत्रांवर कोर्ट फी स्टँप लावण्याची सक्ती सेतु केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून केली जाते. कित्येकदा मुद्रांकाचा तुटवडा असतो, अशावेळी तर आर्थिक फटक्याबरोबरच जनतेचा वेळेचाही अपव्यय होता. लोकांची ही गैरसोय दूर व्हावी म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी हे आवाहन केले आहे. प्रतिज्ञापत्राची जेथे आवश्यकता असते तेथे लोकांनी साध्या कागदावर ते कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर करून द्यावयाचे आहे. तसेच शैक्षणिक कामासाठीच्या कोणत्याही दाखल्यासाठी मुद्रांक शुल्क आकारण्यात येत नसल्याचेही मोरे यांनी कळविले आहे.

नवऱ्याने पेटवल्याने पत्नी व मुलगी गंभीर
धुळे, २९ मे / वार्ताहर

साक्री तालुक्यातील घाणेगाव येथे एकाने पत्नी व दहा वर्षे वयाच्या मुलीवर मध्यरात्रीच्या सुमारास रॉकेल टाकून पेटविले. यात दोघी मायलेकी गंभीररित्या भाजल्या असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. २९ मे रोजी पहाटेच्या सुमारास कैलास मारोती गुंजाळ याने त्याची पत्नी सुरेखा (३५) व मुलगी आशा यांच्यावर रॉकेल टाकून पेटविल्याचा आरोप आहे. यात दोघी मायलेकी ९७ टक्के भाजल्या आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी नोंद जिल्हा रूग्णालयात झाली आहे. या घटनेमागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.