Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

मालदीव : स्वप्नांचे पारदर्शी कवडसे
‘नंदनवनाला जाणारा रस्ता मालदीव बेटांवरून जातो.’ या वाक्याचा कॉपीराइट (जोपर्यंत कुणी चोरून वापरत नाही) तोपर्यंत माझा आहे. ‘‘मी खूप आनंदी आहे. सुंदर सागर, प्रकाशमय दिवस, छान सेवा.. निसर्ग.. जे मी अनुभवलं ते मी कधीच विसरणार नाही. हा माझा ठेवा आहे. एक दिवस मला माझ्या पत्नीसोबत इथं यायचंय.’’ या प्रतिक्रियेच्या खाली दुसरी प्रतिक्रिया लगोलग लिहिलेली आहे. ‘‘.. आणि मी तिचा पती आहे. माझी ही सुटी अप्रतिम होती. इथल्या सेवेबद्दल काय बोलावं.. मी पूर्ण समाधानी आहे आणि पुन्हा कधी तरी मी माझ्या पत्नीसह इथे येईनच. थँक यू, मालदीव’’

एका सांस्कृतिक संघर्षांचा बुकमार्क!
वाचनसंस्कृती, वाचक यांच्या बरोबरीनेच ग्रंथसंग्रहालये आणि त्याविषयीची चळवळ चालविणारे या साऱ्यांची बिच्चारे अथवा निरुपद्रवी अशी संभावना करण्याच्या वृत्तीचा डोंबिवलीसारख्या शहरात उद्भवलेल्या उत्स्फूर्त जनरेटय़ामुळे मुखभंग झाला आहे. सार्वजनिक मालमत्तेकडे विश्वस्ताच्या भूमिकेतून पाहण्याऐवजी मालकाच्या भूमिकेत शिरणाऱ्या प्रशासनालाही यानिमित्ताने चपराक बसली आहे. महापालिकेचे एक ग्रंथालय स्थलांतरित करण्याचा विषय इतका गाजेल याचा अंदाज महापालिकेच्या नोकरशहांना आला नाही. जनक्षोभ निर्माण झाल्यानंतर तो राजकीय विषय बनेल, हे तर कुणाच्याच गावी नव्हते. सार्वजनिक संस्थांचे हित लोकांच्या रेटय़ातून कसे साधले जाऊ शकते, याचा वस्तुपाठ डोंबिवलीतल्या या सांस्कृतिक संघर्षांने घालून दिला आहे.

केरळातला अभिनव प्रयोग
१९६२ साली केंद्र सरकारने पुण्यातला प्रभात स्टुडिओ विकत घेऊन तेथे चित्रपट प्रशिक्षण देण्यासाठी ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’ सुरू केली. केरळचा सध्याचा जगन्मान्य दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन फिल्म इन्स्टिटय़ूटच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी होता. तीन वर्षांनी दिग्दर्शनाचा डिप्लोमा घेऊन अदूर त्रिवेंद्रमला परतला. स्वत:चा चित्रपट दिग्दर्शित करण्याची खटपट त्याने आरंभली. त्याच्यासमोर दोन मुख्य समस्या होत्या. पहिली समस्या होती चित्रपटासाठी भांडवल मिळविण्याची. त्यासाठी मित्रांना जमवून अदूरने १९६५ मध्ये फिल्म को-ऑपरेटिव्ह सुरू केली. पण दुसरी समस्या त्याहून गंभीर होती.