Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

अलिबाग नगर परिषदेच्या मुख्य सभागृहास महाराष्ट्र भूषण डॉ़ नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव
अलिबाग, २९ मे/ प्रतिनिधी

 

महाराष्ट्र भूषण डॉ़ नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव अलिबाग नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील मुख्य सभागृहास देऊन आगळी आदरांजली वाहण्याचा निर्णय नुकताच अलिबाग नगर परिषदेने एकमताने घेतला असून, हा नामकरण सोहेळा रविवार, ३१ मे रोजी दुपारी चार वाजता नगर परिषदेच्या प्रांगणात निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रशांत नाईक व मुख्याधिकारी व्ही़ डी़ डाके यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आह़े महाराष्ट्र भूषण डॉ़ नारायण ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांनी रेवदंडा या आपल्या गावापासून सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यासारख्या विविध विषयांवर दासबोध निरुपणाद्वारे संपूर्ण भारत देशातच नव्हे, तर जगाच्या विविध भागांमध्ये मोठा प्रमाणावर समाजप्रबोधन व जनजागृती करून आदर्श सत्पुरुष म्हणून ओळख निर्माण केलेली आह़े त्यांच्या या कार्याचा विविध स्तरावरून वेळोवेळी गौरव करून सन्मानित करण्यात आलेले आहे, याचा अलिबागचे रहिवासी म्हणून आम्हासही सार्थ अभिमान आह़े त्यांच्या या कार्याचे सदैव स्मरण राहावे याकरिता, हे नामकरण करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे.