Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

वाळूचे कण रगडिता
प्रसाद रावकर

गवतापासून कोळशाची निर्मिती! हे कसं शक्य आहे? असा प्रश्न कुणाच्याही मनात डोकावेल. पण रायगड जिल्ह्यातील नागोठण्याजवळील रिलायन्स इंडस्ट्रिजच्या कॅम्पसमध्ये ही किमया घडली आहे. याशिवाय या कंपनीने रिलायन्स पेट्रोकेमिकल टाऊनशिपसह संपूर्ण कॅम्पसमध्ये कचरामुक्त परिसर (झीरो गार्बेज) हा प्रकल्प राबवून पर्यावरणरक्षणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्याचबरोबर इंधन बचतीसाठी ‘सरई कुकर’चा वापर व्हावा यासाठी प्रचार व प्रसाराची धुराही कंपनीने खांद्यावर घेतली आहे.

नमिता देशपांडे
बावीस वर्ष ती जंगलात रहात होती.. तिची दिनचर्या इतरांप्रमाणेच होती.. पण काम झालं की घरी न जाता जंगलात जायची.. तिथेच जेवण, तिथेच विश्रांती.. बरोबर तीन मुलं.. आईच्या प्रेमापोटी मुलेही जंगलातच राहात होती.. आईच्या काळजीने बालवयातच या मुलांनी जंगलात राहणं पसंत केलं होतं.. त्यांची घरची मंडळी आणि गावकरी कोणीच त्यांना स्वीकारत नव्हतं.. मात्र आज हे कुटुंब स्वत:च्या हिमतीवर सुखाने नांदत आहेत..

सुनील डिंगणकर
या शैक्षणिक वर्षांत पदवीधर होणारे विद्यार्थी नोकरी कुठे आणि कशी मिळेल याच्या शोधात आहेत, सध्या जे नोकरी करीत आहेत ते यंदा पगारवाढ किती होईल याचा विचार करीत आहेत, आर्थिक मंदीच्या या परिस्थितीत काही जण दुसऱ्या कंपन्यांकडून येणाऱ्या ऑफर स्वीकारायची की नाही या विवंचनेत आहेत. आर्थिक मंदीच्या काळात नोक ऱ्या आहेत का?, असल्या तर कोणत्या क्षेत्रात आहेत?, पगारवाढीची स्थिती काय?, ही वेळ ‘शिफ्ट’साठी योग्य आहे का? असे नानाविध प्रश्न अनेकांना सतावत आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न..

किशोर धारगळकर
सिनेपत्रकाराच्या कामातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रीमियर व पाटर्य़ा. यासाठी रात्री उशिरापर्यंत कार्यरत राहणे, पण आपले हे कर्तव्य बजावत असताना अनपेक्षितपणे वा अनवधानाने एखाद्या सिनेपत्रकारावर चक्क ‘जेलची हवा’ खायची वेळ येते, पण त्यावेळी त्याच्या पाठीशी तेवढय़ाच तातडीने याच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत जागरूक दिग्दर्शक ठामपणे उभा राहतो व ही कथा एक नवीन वळण घेते..

स्त्रीजन्माची अजून एक कहाणी
बंदिनीऽऽ.. स्त्री हीऽऽ बंदिनीऽऽ..हे शीर्षक गीत आपल्यापैकी अनेकांच्या मनात ठसले असेल. वीस वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या या मालिकेआधी आणि नंतरही अनेक चित्रपटांतून स्त्री व्यक्तिरेखेची हतबलता आणि होणारी फरफट दाखविण्यात आली आहे. सध्या बहुतेक वाहिन्यांवर सुरू असलेल्या दैनंदिन मालिका स्त्रीप्रधानच असल्यामुळे एखाद्या स्त्रीला किती प्रकारच्या यातना सहन कराव्या लागू शकतात, हे आता प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे. असे असूनही स्त्री व्यक्तिरेखेची झालेली वाताहत दाखविण्याचा सोस अनेक लेखक-दिग्दर्शकांना असतो. ‘त्या रात्री पाऊस होता’ हा चित्रपटही ‘स्त्रीजन्माची अजून एक कहाणी’ झाला आहे.

एका वास्तवाचे नजाकतदार कथारूप
युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवरचं जुआरेझ हे मेक्सिकन शहर. तिथल्या फॅक्टरीतल्या तरुण कामगार स्त्रियांच्या रहस्यमय खूनसत्राचा शोध घेण्यासाठी ‘शिकागो सेंटिनल’ या अमेरिकन वृत्तपत्राची वार्ताहर लॉरीन (जेनिफर लोपेझ) तिथे पोहोचते. संपादक कामगिरी सोपवतो, तेव्हा अनिच्छा दर्शविणारी लॉरीन नंतर ती कामगिरी स्वीकारते आणि जुआरेझमध्ये येऊन दाखल होते. खून-सत्रातून आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या इव्हा या मेक्सिकन फॅक्टरी कामगार मुलीला हाताशी धरून लॉरीन या प्रकरणाचा शोध घेऊ लागते आणि त्या कामात तिला वेगवेगळ्या पातळ्यांवर विरोध होऊ लागतो. जिवावरही बेतते आणि अखेरीला तिच्या बातमीचे ‘ग्रेट स्टोरी’ म्हणून कौतुक करणारा संपादक ती बातमी प्रसिद्ध करीतच नाही! आणि न्यायालयात इव्हाला न्याय मिळवून देण्यासाठी या बातमीची अत्यंत गरज असते.

‘मैतर’ कलेचे.. कलावंतांचे!
कुठलीही कला किंवा कलावंत एकारलेपणानं जगू लागला/ लागली की त्यांना ओहोटी लागलीच म्हणून समजावी. कलेला व कलावंतालाही इतरांची साथ लागते, तरच ती कला आणि तो कलावंत जाणीवसमृद्ध होत जातात. ही मूलभूत जाणीव असणं, ही बाब हल्ली अगदी दुर्मिळ होत चाललीय. आजच्या व्यक्तिवादी जगात ‘मी म्हणजेच सर्व काही’ असा भ्रम बाळगणाऱ्यांचीच बहुसंख्या आढळते. त्यातही कलावंत मंडळी तर फारच आत्मकेंद्री जीवन जगताना दिसतात. त्यांना आपल्यापलीकडे दुसरं विश्वच माहीत नसतं. परिणामी अशा कोषातल्या जगण्यात यशाच्या कैफाबरोबरच निराशेची गर्ताही कमालीच्या वेगानं येऊन कोसळते. आणि त्यात त्यांचा व त्यांच्या कलेचा विनाश मग अटळ ठरतो.

राधाचा आवाज ‘मंगेशकरी’ नव्हे, वेगळा आणि स्वतंत्र - लता मंगेशकर
दिमाखदार सोहळ्यात ‘माझं नाव शामी’अल्बमचे प्रकाशन
प्रतिनिधी

राधाचा आवाज मंगेशकरी नाही तर तिचा आवाज हा तिचा स्वत:चा असून तो वेगळा आहे. त्या आवाजाला स्वतंत्र ओळख आहे, असे मत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी शुक्रवारी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात व्यक्त केले. हृदयेश आर्ट व एचएमव्ही- सारेगामा इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात लता दीदींच्या हस्ते हृदयनाथ मंगेशकर यांची कन्या राधा मंगेशकर यांच्या ‘माझं नाव शामी’ या अल्बमचे प्रकाशन झाले. या प्रसंगी व्यासपीठावर गायिका राधा मंगेशकर, आल्बमचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, अल्बममध्ये ज्यांची तीन गाणी आहेत ते गीतकार व कवी सुधीर मोघे, ‘सारेगामा’चे वरिष्ठ अधिकारी जी. बी. अहिरे व अतुल चुडामणी आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ कवी प्रा. शंकर वैद्य उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना दीदी बोलत होत्या.

गरज पर्यावरण रक्षकांची
वाढत्या उपनगरातील वृक्ष संवर्धनाच्या चुकीच्या नियोजनामुळेही तापमान वाढत आहे. रस्ते वाहतुकीस प्राधान्य देताना रस्त्यापासून ५ फूट दूर अंतरावर दुतर्फा शीतल छाया देणाऱ्याच वृक्षांची वाढ होणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर फुलांनी फुललेल्या पर्णविरहीत बहावा, काटे सावर, पांगारा तसेच सोनमोहरसारख्या तत्सम वृक्षामुळे शहराच्या तापमानात CO2 वाढून भर पडू शकते. नजर सुखेसाठी हे वृक्ष छान पण एवढे सुख घेण्याइतपत वेळ मुंबईकरांकडे आहे का? लॅण्डस्केप, शहरातील बागा, गृहसंकुलांच्या वस्त्या तेथेच त्यांचे वास्तव्य असावे.

चाणक्यवृत्त अर्थशास्त्राचे अंतरंग
Yeeie 2
आर्य चाणक्य यांचे अर्थशास्त्राचे हस्तलिखित सापडले त्याला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने.. आधुनिक परिभाषेत अर्थ म्हणजे पैसा असल्यामुळे अर्थशास्त्र.. म्हणजे वित्तविषयक शास्त्र असे कोणालाही वाटणे सहज शक्य आहे. पण ग्रंथाच्या पंधराव्या अधिकरणात अर्थशास्त्र म्हणजे काय ते समजावून सांगितले आहे. त्यानुसार ‘मनुष्याणांवृत्तिर्थ: मनुष्यवती भूमिरित्यर्थ:।’ असे म्हटले आहे. याचा अर्थ मनुष्याच्या उपजीविकेचे साधन म्हणजे मानवी वस्ती असलेला भूप्रदेश होय. अशा पृथ्वीचा लाभ व तिचे पालन याविषयीचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. प्राचीन काळी राज्यशास्त्र, राजनीती किंवा राजकीय तत्त्वज्ञान, वित्तशास्त्र असे राजनीतीचे वेगवेगळे भाग नव्हते. म्हणूनच अर्थशास्त्रात राजनीती, युद्धशास्त्र, अर्थशास्त्र अशा सर्व विषयांची विस्तृत चर्चा येते.

मारुती विश्वासराव : ध्येयवादी कामगार कार्यकर्ता
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील ज्येष्ठ कामगार

नेते डॉ. शांती पटेल यांच्या नेतृत्वाखालील मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अ‍ॅण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनचे गोदी विभागातील तडफदार व सेवाभावी सेक्रेटरी मारुती विश्वासराव यांचा १ जून २००९ रोजी ५० वा वाढदिवस. समाजात विविध प्रकारची माणसे आढळतात ती आपापल्या क्षेत्रात यथाशक्ती काम करतात. समाजातल्या विविध क्षेत्रांत दुर्बल, अडलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जो प्रयत्न करतो, धडपडतो अशा व्यक्तींची संख्या कमी असते. अशाच व्यक्तींपैकी एक धडपडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मारुती विश्वासराव.

एक मनस्वी कलाकार : केशव बडगे
ख्यातनाम लोककलावंत व तबलावादक केशवराव बडगे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. त्यांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली! रंगमंचावरचे दिवे प्रकाशमान होतात. मंचासमोर बराच मोठा जनसमुदाय, प्रत्येकाच्या मनात शंका कार्यक्रम कसा असेल, मजा येईल की नाही? तेवढय़ात हातात जडशीळ, विस्तारलेली पिशवी घेऊन एक डोक्यावरचे केस वाढलेली व्यक्ती येते. त्या माणसाचा साधा तंग चुडीदार वेष. केस अस्ताव्यस्त, त्यापाठोपाठ एक भारदस्त स्त्री येते. तिच्या हातात संगीताची पेटी (हार्मोनियम) असते.

स्किझोफ्रेनिया म्हणजे काय?
स्किझोफ्रेनिया हा नक्की काय आजार आहे? त्यावर उपाय काय? ज्या माणसाला हा आजार झाला असेल त्याच्याबरोबरच्या इतरांनी त्याला कसं सांभाळावं? अशा प्रश्नांच्या संदर्भात डॉ. आय. एच. हिरानंदानी रुग्णालयातील मानसशास्त्रज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा मेंदूचा एक आजार असून त्याचा परिणाम व्यक्तीच्या वैचारिक, भावनिक बाबींवर तसेच शारीरिक हालचाली आणि वागणुकीवरही होतो. हा पूर्णपणे मानसिक आजार असून ब्लॅक मॅजिक, भूतकाळातील पाप, नशीब, भूतप्रेत या गोष्टींचा या विकाराशी काहीही संबंध नाही. इतर शारीरिक आजारांवर ज्या प्रकारे कायम औषधे घ्यावी लागतात, तसेच स्किझोफ्रेनिक रुग्णालाही आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात.