Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

ऑलिम्पिक २०१२ च्या प्रतीक्षेत ‘गांधीजी’
२०१२ चं ऑलिम्पिक होतंय लंडनमध्ये! त्या निमित्तानं तेथील प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक वास्तू, राजवाडे, प्रमुख रस्ते, म्युझियम्स यांच्या सुशोभिकरणाची सुरुवातही झाली आहे. या साऱ्या धावपळीत तिथलं एक ऐतिहासिक स्मारक डोळे लावून बसलंय, ते कात टाकून नव्यानं सज्ज होण्यासाठी! लंडनच्या पूर्वेकडच्या भागातल्या किंग्जले हॉलमधील गांधी फाऊंडेशनला प्रतीक्षा आहे ती नवं रूप धारण करण्याची! हेरिटेज दर्जाच्या या वास्तूकडे म्हणावं तितकं कुणाचं लक्ष गेलेलं नाही. १९३१ साली राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी गांधींजींनी या वास्तूत बारा आठवडे वास्तव्य केलं होतं. गांधीजींच्या विचारधारेची या वास्तूत चालणाऱ्या साऱ्या उपक्रमांना मोठी पाश्र्वभूमी आहे. तरीही ही वास्तू आजही म्हणावी, इतकी सर्वाना ठाऊक नाही.

देवभूमीतील समाजसेवेची चार तपे
सत्तर वर्षांच्या आजीबाईंनी पदराआड लपविलेले चार आक्रोड डॉक्टरांना दिले. सैन्यात असलेल्या मुलासाठी जपून ठेवलेले हे आक्रोड देताना तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. मुंबईहून एवढय़ा दूर येऊन आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर तिच्यासाठी देवदूतच होते. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यातील गुप्तकाशीजवळील देवरगाव या हरीजन वस्तीत घडलेली ही घटना शबरीने रामाला दिलेल्या उष्टय़ा बोराच्या गोष्टीशी मिळती जुळती म्हणावी लागेल. उत्तराखंड हे नव्याने निर्माण झालेले राज्य प्राचीन काळापासून देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. गंगोत्री, जन्मोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ या चारधामांसह हिंदुंची अनेक प्रसिद्ध तिर्थस्थाने या ठिकाणी आहेत. हरिद्वार आणि ऋषीकेशपासून सुरू होणारा हा देवभूमीचा प्रवास हिमालयात जोगोजागी पाहावयास मिळतो.

सतराव्या- अठराव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाण- घेवाणीतून केले जात. सोन्या- चांदीच्या नाण्यांचा उपयोग मुख्यत: व्यापारी आणि राजांपुरता मर्यादित असे. आजच्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती. पैसा सामाजिक नात्यांमध्ये बाधा आणतो असे काहींना वाटते. पैसा आणि अर्थव्यवस्था यांचे नाते आपल्याला कळते आणि पैसा नसणारे लोक गरीब असतात हेही कळते. परंतु पैशाला महत्त्व कशामुळे आले? यामुळे मानवजातीचा फायदा झाला की तोटा? पैसा म्हणजे काय?